Stock Market Crash: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 821 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडाले

Stock Market Crash: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली असून सेन्सेक्स 821 अंकांनी तर निफ्टी 286 अंकांनी घसरला.
Stock Market Crash
Stock Market CrashPudhari
Published on
Updated on

Stock Market Crash: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. बीएसई सेन्सेक्स तब्बल 821 अंकांनी घसरून 73,421 वर उघडला, तर निफ्टी 286 अंकांनी कोसळत 23,080 वर पोहोचला. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत, अमेरिकन बाजारातील विक्रीचा दबाव आणि गुंतवणूकदारांमधील सावध भूमिका यामुळे बाजारावर दबाव वाढल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यातही बाजारात घसरण कायम होती. निफ्टी सुमारे 0.8 टक्क्यांच्या घसरणीसह 23,366 वर बंद झाला होता. त्यानंतर सोमवारी पुन्हा मोठ्या घसरणीने बाजाराची सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मिश्र चित्र दिसून आले. मिडकॅप निर्देशांकात सुमारे 1.2 टक्क्यांची घसरण झाली, तर स्मॉलकॅप निर्देशांकाने किरकोळ 0.2 टक्क्यांची वाढ दाखवली होती. मात्र आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात व्यापक विक्रीचा दबाव दिसून आला.

क्षेत्रनिहाय कामगिरीचा विचार केला तर गेल्या आठवड्यात कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्राने सर्वाधिक चमक दाखवली होती. या निर्देशांकात 1.7 टक्क्यांची वाढ झाली होती. बँकिंग आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्सनीही सकारात्मक कामगिरी केली होती. मात्र पॉवर क्षेत्रावर सर्वाधिक दबाव होता. बीएसई पॉवर निर्देशांक तब्बल 3 टक्क्यांनी घसरला होता. याशिवाय रिअल्टी आणि एफएमसीजी क्षेत्रातही जवळपास 2 टक्क्यांची घसरण झाली होती.

वैयक्तिक शेअर्सचा विचार केला तर टायटन हा गेल्या आठवड्यातील सर्वात मोठा परतावा देणारा शेअर ठरला. कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 4.5 टक्क्यांची वाढ झाली होती. तसेच अदानी एंटरप्रायझेस आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्येही 3 ते 4 टक्क्यांची मजबुती दिसून आली होती.

Stock Market Crash
Sanvidhan Bhan: संविधान-भान: भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा शोध घेणारा ग्रंथ

दुसरीकडे एनटीपीसी हा सर्वात मोठा तोट्यातील शेअर ठरला. कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 6.5 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फिनसर्व या शेअर्समध्येही 4 ते 5 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली.

बाजाराच्या पुढील वाटचालीबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. एसबीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार निफ्टीसाठी 23,100 ते 23,050 हा महत्त्वाचा सपोर्ट झोन मानला जात आहे. जर निफ्टी या पातळीखाली घसरला, तर बाजारात आणखी मोठी घसरण होऊन निर्देशांक 22,700 पर्यंत खाली येऊ शकतो.

Stock Market Crash
Vaibhav Suryavanshi: भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वीच वैभव सूर्यवंशीला इशारा; सौरव गांगुली काय म्हणाला हे वाचून बसेल धक्का

मात्र बाजारात खरेदी वाढली आणि निफ्टीने पुनरागमन केले, तर 23,550 ते 23,600 हा महत्त्वाचा रेसिस्टन्स झोन असेल. हा टप्पा पार करण्यात यश आले, तर निफ्टी 23,900 आणि त्यानंतर 24,100 च्या दिशेने वाटचाल करू शकतो.

सध्या जागतिक आर्थिक घडामोडी, व्याजदरांबाबतच्या अपेक्षा आणि परदेशी गुंतवणूकदारांचा कल यावर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय न घेता सावधगिरी बाळगणे आणि दीर्घकालीन गुंतवणूक धोरणावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news