

Stock Market Today: आज शेअर बाजाराने सपाट सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स 12 अंकांनी किरकोळ वाढीसह 85,150.64 वर उघडला, तर निफ्टी 50 निर्देशांक 26,004.90 वर 27 अंकांनी घसरणीसह उघडला. व्यापाराच्या पहिल्या अर्ध्या तासात IT, फार्मा आणि मेटल शेअर्सनी बाजाराला आधार दिला, तर FMCG, PSU बँक आणि ऑटो सेक्टरमध्ये घसरण झाली.
जियोजीत इन्व्हेस्टमेंट्सचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट डॉ. व्ही.के. विजयकुमार म्हणाले की
"निफ्टीमध्ये गेल्या काही दिवसांत 300 अंकांची घसरण झाली आहे, हे लहान करेक्शन आहे."
त्यांच्या मते या घसरणीमागे दोन प्रमुख कारणे आहेत:
1. बँक निफ्टीचे वेटेज बदलणे (Re-jig) - HDFC बँक व ICICI बँकेचे वेटेज कमी झाले, हे केवळ टेक्निकल कारण आहे, कंपन्यांच्या बिझनेस किंवा फंडामेंटल्सशी याचा संबंध नाही.
2. रुपया सतत घसरत आहे – RBI डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप करत नाही, त्यामुळे FII मध्ये भीती निर्माण झाली आहे की रुपया आणखी घसरेल.
त्यांनी पुढे सांगितले, "GDP वाढत आहे, कॉर्पोरेट्सची कमाई चांगली आहे, तरीही FII विक्री करत आहेत. टेक्निकल करेक्शन लवकर संपेल, पण रुपया स्थिर नसताना बाजारात घसरण होऊ शकते."
सकाळी 9:25 वाजता खालील शेअर्समध्ये चांगली वाढ झाली:
TCS – 1.18% वाढ
इन्फोसिस – 0.89% वाढ
Eternal – 0.55% वाढ
Sun Pharma – 0.41% वाढ
HUL – 2.5% घसरण
Titan – 1.16% घसरण
BEL – 1.15% घसरण
Tata Motors PV – 1.01% घसरण
NTPC – 0.80% घसरण
बाजारावर सध्या जागतिक संकेतांबरोबरच रुपयाची घसरण आणि FIIच्या विक्रीचा प्रभाव दिसत आहे. बाजाराची दिशा पुढील काही दिवस रुपयातील स्थिरता आणि RBI च्या भूमिकेवर अवलंबून आहे.