Silver Price: फक्त एका वर्षात पैसे दुप्पट; चांदीने गुंतवणूकदारांना दिला जबरदस्त रिटर्न, भाव 2 लाखांवर जाणार

Silver Price India: चांदीच्या किमतींमध्ये 2025 मध्ये अभूतपूर्व वाढ झाली असून भारतीय बाजारात तब्बल चांदीने 108 टक्के रिटर्न दिला आहे. सोलर एनर्जी क्षेत्रातील वाढती मागणी आणि जागतिक आर्थिक वातावरणामुळे चांदीचे दर वाढत आहेत.
Silver Price
Silver PricePudhari
Published on
Updated on

Silver Price India Future Prediction: 2025 हे वर्ष चांदीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. न्यूयॉर्कपासून दिल्लीपर्यंत चांदीच्या भावाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जागतिक बाजारात चांदीने 102% रिटर्न दिला आहे, तर भारतीय वायदा बाजारात चांदीने 108% पेक्षाही जास्त रिटर्न दिला आहे. देशात एमसीएक्सवर चांदीचा भाव तब्बल ₹1.81 लाख प्रति किलोच्या पुढे गेला आहे. या वाढीने 46 वर्षांचा विक्रम धुळीस मिळवला असून गुंतवणूकदार आता एकच प्रश्न विचारत आहेत, चांदीचा भाव खरंच ₹2 लाखांपर्यंत जाईल का?

जागतिक बाजारात 46 वर्षानंतर विक्रमी वाढ

1979 नंतर प्रथमच चांदीने जगभरात इतकी धडाकेबाज वाढ केली आहे. 2025 मध्ये चांदी 102% ने वाढली. जागतिक बाजारात चांदी $58.83 प्रति औंसच्या ऑल-टाईम हायवर गेली. त्यानंतर किंचित घसरण झाली आणि भाव $57.42 वर आले, तरीही विश्लेषकांचा अंदाज आहे की येत्या काही महिन्यांत चांदी $59 किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकते. चांदीने यापूर्वीही सोन्यापेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. 2008 ते 2011 दरम्यान चांदीत तब्बल 431% वाढ झाली होती.

भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही चांदीने गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. 2024 च्या शेवटच्या दिवशी चांदीचा भाव होता ₹87,233 प्रति किलो. 2025 मध्ये हा भाव वाढून ₹1,81,601 प्रती किलोवर गेला. म्हणजेच ₹94,368 प्रति किलोची वाढ झाली. इतकी तेजी भारतीय बाजारात अनेक वर्षानंतर पाहायला मिळाली.

Silver Price
Mega Bank Merger: तुमची बँक बंद होणार? लहान बँकांना लागणार कुलूप; IFSC, खाते क्रमांक... काय काय बदलणार?

चांदीच्या भावात एवढी प्रचंड वाढ का होत आहे?

चांदीच्या तुफानी वाढीमागे दोन मुख्य कारणे आहेत—

1. औद्योगिक मागणीत वाढ

• सौरऊर्जा क्षेत्रात चांदीचा वापर झपाट्याने वाढतो आहे.
• 2024 मध्ये सोलर सेक्टरमध्येच 243.7 मिलियन औंस चांदीचा वापर झाला, जो 2020 च्या तुलनेत 158% जास्त आहे.
• 2030 पर्यंत सोलर सेक्टरमध्ये चांदीची वार्षिक मागणी 150 मिलियन औंसने वाढू शकते.

2. प्रोडक्शन (पुरवठा) सतत घटत आहे

चांदीच्या खाणी वाढत नाहीत, पण मागणी सातत्याने वाढत आहे, त्यामुळे 'सप्लाय-डिमांड गॅप' प्रचंड वाढला आहे.याशिवाय—

• फेडरल रिझर्व्ह व्याजदरांमध्ये कपातीचे संकेत देत आहे.
• गुंतवणूकदारांचा ETFs मध्ये मोठा इनफ्लो
• जागतिक आर्थिक अनिश्चिततेत सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीला वाढती मागणी

या सर्व कारणांमुळे चांदीचे भाव वाढत आहेत.

चांदी खरंच 2 लाख प्रति किलो होईल का?

तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे की, चांदी 2 लाखांचा टप्पा गाठू शकते.

• या महिन्यातच मार्च कॉन्ट्रॅक्ट ₹1,85,000 ते ₹1,90,000 गाठू शकतात.
• 2026 च्या पहिल्या तिमाहीत चांदी ₹2,00,000 प्रति किलो पार करू शकते.
• ETF मागणीत वाढ, सौरऊर्जा क्षेत्रातील विस्तार आणि अमेरिकन व्याजदर कपात या प्रमुख कारणांमुळे चांदीमध्ये आणखी वाढ होईल.

या 'वेल्थ ग्लोबल रिसर्च'चे डायरेक्टर अनुज गुप्ता म्हणतात, फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये चांदी ₹2 लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

Silver Price
Real Estate Market: रिअल इस्टेटचा ‘गोल्डन टाइम’ सुरु झालाय; जगभरातील दिग्गज कंपन्यांची भारतात एन्ट्री

गुंतवणूकदारांनी काय करावे?

• दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांदी उत्तम पर्याय ठरू शकते
• मात्र, सध्याच्या परिस्थितीत SIP मध्येच गुंतवणूक करावी
• ETF, सिल्वर फ्युचर्स किंवा पेपर सिल्वर अधिक सुरक्षित पर्याय आहेत
• जास्त जोखीम घेऊन मोठी गुंतवणूक करू नये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news