

Stock Market Opening Updates
भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.२५ जून) सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. सुरुवातीला सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ८२,५६० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक १५० अंकांनी वाढून २५,१९० वर व्यवहार करत आहे. आयटी आणि एनर्जी शेअर्समध्ये अधिक तेजी दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवरग्रिड, इन्फोसिस, एचसीएल टेक, रिलायन्स, एम अँड एम, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढून खुले झाले आहेत. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि कोटक बँक हे दोन शेअर्स घसरले आहेत.
सेक्टरल फ्रंटवर निफ्टी आयटी १ टक्के वाढला आहे. निफ्टी आयटीवर इन्फोसिस, कोफोर्ज, एचसीएल टेक, LTIMindtree आणि ओएफएसएस हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के वाढले आहेत. ऑटो, एफएमसीजी, फार्मा, कन्झ्यूमर ड्युराबेल्स आणि ऑईल अँड गॅस हे निर्देशांकदेखील वाढले आहेत.
इस्रायल आणि इराणमधील तात्पुरत्या स्वरुपाच्या युद्धबंदीमुळे कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. यामुळे बुधवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली.