Stock Market Updates | बाजार पुन्हा तेजीच्या महामार्गावर!

स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये वाढ
market-back-on-bullish-track
Stock Market Updates | बाजार पुन्हा तेजीच्या महामार्गावर!Pudhari File Photo
Published on
Updated on
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

इस्रायल-इराण संघर्षात इस्रायलच्या बाजूने सक्रिय होण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे लांबणीवर ठेवला आणि शेअर बाजारात खुशीची लहर शुक्रवारी दौडत गेली. जणू युद्धविरामच झाला! निफ्टीने ट्रिपल सेंच्युरी मारली, तर सेन्सेक्सने एक हजारी उसळी मारली. निफ्टी बँक पावणेसातशे अंक वाढून 56000 च्या वर बंद झाला. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्स चांगलेच वाढले. एकूण एक सेक्टरल इंडायसेस तेजी दर्शवीत होते.

भारतीय अर्थव्यवस्थेतील मजबूत मॅक्रो इंडीकेटर्स आणि FIIS चे हळूहळू भारतीय बाजारात परतणे, कमी होत असलेली महागाई, समाधानकारक मान्सून, वाढते जीएसटी संकलन यामुळे गुंतवणूकदार Buy on dips च्या पवित्र्यात आहेत. कारण, बुधवारी अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी करणे टाळले आणि त्याचे निमित्त होऊन आधीच युद्धाच्या तणावात असलेला बाजार गुरुवारी असा काही कोसळला होता की, स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्स पार धुऊन निघाले होते; शिवाय कू्रड ऑईल 2 टक्के खाली आल्यावर भारतीय बाजार वर जाणार, हे ओघानेच आले.

निफ्टी रिअ‍ॅल्टी इंडेक्स सुसाट सुटलेला आहे. मागील तीन महिन्यांत तो वीस टक्के वाढला आहे.

या इंडेक्समधील खालील शेअर्स आणि मागील तीन महिन्यांत त्यांनी दिलेले रिटर्न्स पाहा :

1) Prestige (Rs. 1716.30) - 42.94 %

2) Lodha (Rs. 1483.20) - 25.97 %

3) Raymond (Rs. 587.50) - 23.60 %

4) DLF (Rs. 854.25) - 22.46%

5) Brigade (Rs. 1144.60) - 20.69%

इंडेक्सबाहेरील पुढील रिअ‍ॅल्टी शेअर्स चांगली तेजी दाखवत आहेत. Tarc, Ajmera Realty, Suraj Estate Developers, Kolte-patil Developers, Purvankara, PSP Projects, DB Realty Gyan Developers and Builders ही रिअ‍ॅल्टी सेक्टरमधील एक कंपनी आहे. शेअरचा भाव रु.38.5 आहे. कंपनीचे मार्केट कॅप आहे केवळ साडेअकरा कोटी रु. पी.ई. रेशो 12 आहे आणि कंपनीचा ROCE 32.2% तर ROE 22.4 % आहे. पूर्णतः कर्जमुक्त कंपनी आहे आणि याच वर्षी कंपनी तोट्यातून नफ्यात आली आहे. या कंपनीच्या शेअरवर अवश्य लक्ष ठेवा. मल्टीबॅगर्स अशाच पद्धतीने मिळत जातात. या शेअरने एका महिन्यात 60 टक्के, तर एका वर्षात 156 टक्के रिटर्नस दिले आहेत.

Deepak Chemtex Ltd hr Food, Pharma ceuticals, Cosmetics, Confectionery, inkjet inks यांना लागणारे कलर्स बनविते. मार्केट कॅप केवळ रु. 163 कोटी असणारी ही एक मायक्रो कॅप कंपनी आहे. शेअरचा भाव रु. 150 असून, पी.ई. रेशो 13 आहे. कंपनीचा ROCE 34 टक्के, तर ROE 26 टक्के आहे. पूर्णतः कर्जमुक्त असणार्‍या या कंपनीचा तीन वर्षांचा सरासरी सेल्स ग्रोथ 14 टक्के, तर प्रॉफिट ग्रोथ 44 टक्के आहे.

Insolation Energy Ltd ही कंपनी सोलार पॅनेल्स आणि मॉड्युल्स बनविते. कंपनीची थक्क करणारी आर्थिक कामगिरी पाहा ः

P.E. - 43.2

ROCE - 56.6

ROE - 49.9

3 years sales growth - 81%

3 years Profit growth - 160%

अतिशय उत्कृष्ट फंडमेंटल्स

असणारा हा शेअर आज रु. 240 ला मिळतो आहे. 52 Week high आहे 475 रु. आणि Low आहे रु. 207 कंपनीचे Q4 2025 चे आर्थिक निकाल उत्तम आहेत. शेअर सध्या Consolidation Phase मध्ये आहे.

वर दिलेल्या दोन कंपन्यांची उदाहरणे प्रतिनिधिक स्वरूपाची आहेत. थोडासा अभ्यास केला आणि कष्ट घेतले, तर असे उत्कृष्ट शेअर्स आपल्याला मिळू शकतात. परंतु, आपण नवनवीन वाटा धुंडाळण्याचे कष्ट घेत नाही. शेअर बाजार हा जाता जाता पैसे कमविण्याचा विषय नाही. जो यामध्ये निरंतर अभ्यास करून स्वतःला झोकून देतो, तोच यशस्वी होतो. खाली काही अशाच उत्कृष्ट शेअर्सची यादी देत आहे. वाचकांनी त्याचा अधिक अभ्यास करावा. तत्पूर्वी पेन्नी स्टॉकच्या भावातील एका दर्जेदार स्टॉकचे उदाहरण पाहा :

Taparia toals ltd ही हँड टूल्स म्हणजे स्क्रू डाईव्हर्स, स्पॅनर्स, प्लायर्स, सॉकेटस् बनविणारी कंपनी आहे. मार्केट कॅप केवळ 33 कोटी रुपये आहे. शेअरचा भाव रु. 22 आहे. पी.ई. रेशो 0.27 आहे. कंपनी कर्जमुक्त आहे. खालील आकडेवारी पाहा :

ROCE - 47.9

ROE - 35.6

Dividend Yield -182%

3 yrs sales growth -11%

3 yrs Profit growth - 24%

हँड टूल्सचा खप पाहता, हा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news