Stock Market Opening | शेअर बाजार हिरव्या रंगात खुला, जाणून घ्या टॉप गेनर्स शेअर्स कोणते?

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी वाढला
Stock Market Opening bell
शेअर बाजार बुधवारी हिरव्या रंगात खुला झाला आहे.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Stock Market Opening Updates

भारतीय शेअर बाजाराने बुधवारी (दि.११ जून) हिरव्या रंगात सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी वाढून ८२,५०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३० अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,१३० वर व्यवहार करत आहे.

सेक्टर्समधील निफ्टी बँक, एफएमसीजी, फायनान्सियल सर्व्हिसेस, आयटी निर्देशांक घसरले आहेत. तर निफ्टी ऑटो ०.८ टक्के वाढला आहे. मेटल, रियल्टी हे निर्देशांकही वाढून खुले झाले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांत तेजी कायम आहे.

Sensex Today | टॉप गेनर्स शेअर्स कोणते?

सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर्स १.६ टक्के वाढून टॉप गेनर ठरला आहे. त्याचबरोबर एम अँड एम, इर्टनल, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, इन्फोसिस हे शेअर्सही तेजीत खुले झाले आहेत. तर कोटक बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, एसबीआय हे शेअर्स घसरले आहेत.

Stock Market Opening bell
Reliance Industries | रिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टेक टॉप 30 लिस्टमध्ये पटकावले स्थान, पहिलीच भारतीय कंपनी

अमेरिका आणि त्यांचे प्रमुख भागीदारी देश भारत, चीन यांच्यामधील द्विपक्षीय व्यापार चर्चा पुढे जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आज आशियाई बाजारांत तेजी दिसून आली. याचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनीही तेजीत सुरुवात केली आहे.

Stock Market Opening bell
Home Loan With Low Credit Score | आता केवळ 500 क्रेडिट स्कोर असला तरी मिळणार होम लोन? जाणून घ्या संपूर्ण माहिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news