Reliance Industries | रिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टेक टॉप 30 लिस्टमध्ये पटकावले स्थान, पहिलीच भारतीय कंपनी

Reliance Industries | JioHotstar मर्जरनंतर डेटा आणि मीडिया क्षेत्रातही आघाडीवर
Reliance India Ltd. - Mukesh Ambani
Reliance India Ltd. - Mukesh Ambani Pudhari
Published on
Updated on

Reliance Industries

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. प्रसिद्ध टेक अ‍ॅनालिस्ट मॅरी मीकर यांच्या 'ग्लोबल टेक टॉप 30' लिस्टमध्ये रिलायन्सचा समावेश झाला असून, ही लिस्ट म्हणजे जगभरातील आघाडीच्या टेक कंपन्यांची यादी आहे. विशेष म्हणजे, या लिस्टमध्ये समाविष्ट होणारी रिलायन्स ही एकमेव भारतीय कंपनी आहे.

जगातील टेक्नो जायंट कंपन्यांचा यादीत समावेश

या प्रतिष्ठित यादीत मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया, अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन आणि अल्फाबेट (Google च्या पेरेंट कंपनी) सारख्या टेक जायंट्सचा समावेश आहे. यातील बहुतेक कंपन्यांची मुख्यालयं अमेरिका, तैवान, चीन, नेदरलँड्स आणि दक्षिण कोरियामध्ये आहेत.

त्यामुळे या जागतिक मंचावर रिलायन्स इंडस्ट्रीजचा समावेश होणे, हे भारतीय टेक इंडस्ट्रीसाठी अत्यंत मोठं यश मानलं जात आहे.

Reliance India Ltd. - Mukesh Ambani
Mukesh Ambani | मुकेश अंबांनी यांनी दिली 150 कोटी रूपयांची गुरूदक्षिणा! शिक्षकांच्या प्रेरणेसाठी अभूतपूर्व योगदान

AI क्षेत्रातील विस्तारामुळे जागतिक ओळख

मॅरी मीकर यांनी ही लिस्ट टेक्नोलॉजी क्षेत्रात कामगिरी, नवकल्पना आणि ग्लोबल इम्पॅक्टच्या आधारे तयार केली आहे. रिलायन्सचा समावेश विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील गुंतवणूक आणि प्रगतीमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने देशाच्या डिजिटल लँडस्केपमध्ये क्रांतिकारी बदल घडवले असून, यामध्ये Jio चा मोठा वाटा आहे.

10 लाख कोटींचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी

रिलायन्सने यंदा आणखी एक ऐतिहासिक यश प्राप्त केलं आहे. ही कंपनी 10 लाख कोटी रुपयांची नेटवर्थ ओलांडणारी भारतातील पहिली कंपनी बनली आहे. 10 लाख कोटी म्हणजे सुमारे 120 अब्ज डॉलर. 2025 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत RIL चा कंसॉलिडेटेड रेव्हेन्यू 2.61 लाख कोटी रुपये होता, ज्यामध्ये 9 टक्के वाढ झाली आहे.

Reliance India Ltd. - Mukesh Ambani
Pakistan Water Crisis | पाकिस्तानची कोंडी; सिंधूची धार मंदावली, झेलम-चिनाब पडल्या कोरड्या, धरणांतील पाणीसाठा मृत पातळीवर

रिलायन्स जिओ सर्वात मोठी डेटा कंपनी

कंपनीच्या रिटेल आणि डिजिटल व्यवसायामुळे ऊर्जा क्षेत्रातील अडचणी असूनही प्रचंड फायदा झाला. रिलायन्स जिओने आपली सेवा भारतभरात विस्तारली असून, आज 191 मिलियन 5G यूजर्स सोबत ही कंपनी जगातील सर्वात मोठी डेटा कंपनी ठरली आहे.

JioHotstar मर्जरमुळे मीडिया क्षेत्रातही आघाडी

रिलायन्सची आणखी एक महत्त्वाची वाटचाल म्हणजे JioHotstar मर्जर. या मर्जरमुळे रिलायन्स कंपनी मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रातही मोठी ताकद उभी करत आहे. लॉन्चनंतर अवघ्या दहा आठवड्यांत, जगातील सर्वात मोठं पेड यूजर बेस मिळवणारी हा पहिला प्लॅटफॉर्म ठरला आहे.

Reliance India Ltd. - Mukesh Ambani
water emergency | सन 2030 पर्यंत 'या' शहरातील भूजल संपणार; 70 लाख लोकसंख्येचं काय होणार? केवळ 4.5 वर्षे हातात...

कंपनीची प्रतिक्रिया

या यशावर प्रतिक्रिया देताना रिलायन्सने म्हटलं आहे की, “ग्लोबल रँकिंग ही आमच्या दीर्घकालीन नवप्रवर्तन, नेतृत्व आणि देशबांधणीच्या प्रयत्नांची पावती आहे.” मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायंसने डिजिटल इंडियाच्या दिशेने भक्कम पावलं टाकली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news