

होम लोन घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोर असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. बँका आणि एनबीएफसी (NBFC) संस्था लोन देताना प्रामुख्याने तुमचा क्रेडिट स्कोर पाहतात. चांगला स्कोर असेल तर कमी व्याजदरात, सोप्या अटींवर आणि गॅरंटरशिवाय लोन मिळू शकते. मात्र, जर तुमचा स्कोर 500 इतका कमी असेल, तर लोन मिळण्याची शक्यता खूपच कमी होते.
सीआयबीआयएल (CIBIL), एक्सपेरियन, CRIF हाईमार्क, इक्विफॅक्स यांसारख्या क्रेडिट ब्युरोंच्या मते 500 हा स्कोर अतिशय कमी असून, तो खराब श्रेणीत मोडतो. यामुळे बँकांमध्ये तुमच्यावर विश्वास बसत नाही आणि होम लोनसाठी अडचण निर्माण होते.
एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस यांसारख्या नामांकित बँका साधारणतः 650 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर असणाऱ्या अर्जदारांनाच प्राधान्य देतात. कमी स्कोअर असलेल्यांसाठी बँका फारच सावधगिरी बाळगतात.
बेसिक होम लोनचे सह-संस्थापक अतुल मोंगा यांच्या मते, क्रेडिट स्कोअर कमी असल्यास लोन घेण्याआधी तुमचे एकूण कर्ज कमी करा.
क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30% पेक्षा कमी ठेवा
वेळेवर EMI आणि क्रेडिट कार्डचे बिल भरा
वारंवार नवीन लोनसाठी इनक्वायरी करू नका
दरमहा क्रेडिट रिपोर्ट तपासा व चुका सुधारून घ्या
500 स्कोअर असल्यास:
लोन मिळणे कठीण
व्याजदर 10% पेक्षा जास्त लागू शकतो
काही वेळा सह-अर्जदार किंवा कोलेटरल मागवले जाऊ शकते
म्हणूनच, वेळेवर पेमेंट करून आणि खर्चावर नियंत्रण ठेवून हळूहळू क्रेडिट स्कोअर सुधारण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.