Stock Market Opening | तीन दिवसांनंतर शेअर बाजार हिरव्या रंगात खुला, 'हे' शेअर्स तेजीत

सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात खुले झाले आहेत
Stock Market Opening
तीन दिवसांनंतर शेअर बाजार बुधवारी हिरव्या रंगात खुला झाला.
Published on
Updated on

Stock Market Opening Updates

जागतिक सकारात्मक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजाराने बुधवारी (४ जून) तेजीत सुरुवात केली. सेन्सेक्स १५० अंकांनी वाढून ८०,८८० वर खुला झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ५० हून अधिक अंकांच्या वाढीसह २४,६०० जवळ व्यवहार करत आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात खुले झाले आहेत. गेले तीन दिवस बाजारात घसरण दिसून आली होती.

'हे' शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर भारती एअरटेल, टाटा मोटर्स, इटर्नटल, एम अँड एम, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा हे शेअर्स ०.५ ते १ टक्के वाढले आहेत. तर दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, टायटन, सन फार्मा हे शेअर्स घसरले आहेत.

Stock Market Opening
Home Loan With Low Credit Score | आता केवळ 500 क्रेडिट स्कोर असला तरी मिळणार होम लोन? जाणून घ्या संपूर्ण माहिती

क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी ऑटो, एफएमसीजी, आयटी हे वाढले आहेत. व्होडाफोन आयडियाचा शेअर्स १.५ टक्के घसरला आहे. एरिक्सन इंडियाने कंपनीतील त्यांचा काही उर्वरित बल्क डीलमध्ये विकल्यानंतर व्होडाफोन आयडियाचा शेअर्स घसरला असल्याचे दिसून आले आहे.

जागतिक बाजार

अमेरिकेतील शेअर बाजार मंगळवारी चौथ्या दिवशी वाढून बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रिय ॲव्हरेज निर्देशांकाने २०० हून अधिक अंकांची वाढ नोंदवली. तर नॅस्डॅक सुमारे १५० अंकांच्या वाढीसह स्थिरावला. आज सकाळी आशियाई बाजारांवरही त्याचा प्रभाव दिसून आला. आशियाई बाजारात तेजी राहिली आहे.

Stock Market Opening
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची गडबड सुरू; पण, चुका टाळण्यासाठी 'हे' लक्षात ठेवाच

भारतीय शेअर बाजार मंगळवारी (दि.३ जून) घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्स (Sensex) ६३६ अंकांनी घसरून ८०,७३७ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty 50) १७४ अंकांच्या घसरणीसह २४,५४२ वर स्थिरावला होता. या घसरणीतून सावरत बाजारात रिकव्हरी दिसून आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news