How to File ITR |
विलंब शुल्काशिवाय प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. अशा परिस्थितीत अनेक जणांची रिटर्न भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. तथापि, या गडबडीमध्ये रिटर्न भरताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते. फॉर्म 26AS/AIS आणि TIS (Tax-payer Information Summary) यांची माहिती व तपासणी कशी करावी?
फॉर्म 26AS हे एक कर संक्षेप अहवाल (टॅक्स स्टेटमेंट) आहे जो तुमच्या पॅन नंबरशी जोडलेला असतो. यात खालील माहिती असते.
तुमच्यावर टीडीएस किती कापला गेला आहे.
कर भरलेली रक्कम
तुमच्या नावावरची उत्पन्नाची माहिती (पगार, बँक व्याज, इ.)
तुम्ही केलेल्या हाय व्हॅल्यू व्यवहारांची माहिती.
टप्पे :
www.incometax.gov.in या वेबसाईटवर जा.
तुमचं पॅन वापरून लॉगिन करा.
डॅशबोर्डमध्ये e-File View Form 26AS वर क्लिक करा.
त्यानंतर टीडीएस-सीपीसी पोर्टल उघडेल इथे View Tax Credit (Form 26AS) निवडा.
तुमचं वित्तीय वर्ष (फायनान्शिअल इअर) निवडा आणि View करा
एआयएस हे तुमच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा तपशीलवार अहवाल आहे. हे 26AS पेक्षा खूप सविस्तर आहे. यात समाविष्ट असलेले प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
पगार, व्याज, लाभांश
म्युच्युअल फंड विक्री / खरेदी
शेअर्स, क्रिप्टो व्यवहार
घरभाडं, इतर उत्पन्न
परदेशी व्यवहार, क्रेडिट कार्ड खर्च
टप्पे : www.incometax.gov.in वर लॉगिन करा. Services Annual Information Statement (AIS) वर क्लिक करा. नवीन विंडोमध्ये AIS आणि TIS दोन्ही पर्याय दिसतील. पीडीएफ डाऊनलोड करता येतो आणि त्यात सविस्तर माहिती असते. तुम्ही फीडबॅक देऊ शकता. जर काही माहिती चुकीची असेल, जसे की, चुकीची रक्कम/व्यक्तीने दाखवलेली माहिती.
टीआयएस हे एआयएसचे सरळ व एकत्रित सारांश रूप आहे. थोडक्यात : एआयएस सविस्तर माहिती टीआयएस = त्याच माहितीचा सारांश (उत्पन्न/टॅक्स सल्ला तयार करण्यासाठी सोपा)
उत्पन्नाचा एकूण सारांश (salary, interest, capital gains, etc.) टॅक्स क्रेडिटचा एकूण सारांश (TDS, advance tax)
तुमचा आयटीआर भरतानाचा आधार हे तीन रिपोर्टस् असतात.
जर एखादं उत्पन्न तुम्ही दाखवलं नाही; पण ते AIS/26AS मध्ये असेल, तर नोटीस येऊ शकते.
एआयएस/टीआयएस तपासून आयटीआरमध्ये सर्व माहिती भरली आहे का, ही खात्री करा.
Form 26AS TDS, कर भरणा, काही व्यवहार टॅक्स क्रेडिटची खात्री करण्यासाठी.
एआयएस सर्व उत्पन्न/व्यवहार (खूप तपशिलात) उत्पन्न जुळतंय का, ते तपासा.
टीआयएस-एआयएसचा सारांश आयटीआर भरण्याआधी एकदा तपासा.
नवीन आणि जुन्या आयकर प्रणाली यामधील फरक. भारतातील दोन टॅक्स प्रणाली : जुनं व नवीन. भारत सरकारने वित्त वर्ष २०२०-२१ पासून दोन प्रकारच्या आयकर प्रणाली सुरू केल्या आहेत : १. जुनी टॅक्स प्रणाली आणि २. नवीन टॅक्स प्रणाली