

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने आज जोरदार घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली. ओपनिंगनंतर सेन्सेक्स तब्बल 300 अंकांनी घसरला होता, तर निफ्टीही सुमारे 100 अंकांनी खाली आला. बँक निफ्टीमध्येही 300 अंकांची घसरण दिसून आली. मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव होता, तर मिडकॅप–स्मॉलकॅप इंडेक्सही लाल रंगात होते.
सेन्सेक्स: 84,742 वर उघडून 84,597 च्या दिवसातील नीचांकी पातळीवर आहे
निफ्टी: 25,867 वर उघडून 25,800 च्या पातळीवर आहे
निफ्टी 50 मधील फक्त 4 शेअर्स हिरव्या रंगात होते यात HUL, Indigo, Bharti Airtel, Cipla या शेअर्सचा समावेश होता. तर Asian Paints, Trent, Jio Financial, Hindalco, Eternal, SBI Life, Tech Mahindra, Max Healthcare, Shriram Finance यांच्यात सर्वाधिक घसरण झाली.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक आज सुरू होत असल्याने US बाजारात घसरण झाली.
Dow Jones: 200 अंकांनी घसरला
Nasdaq: 30 अंकांनी खाली
GIFT Nifty: 100 अंकांनी घसरून 25,950 वर
FIIs: सलग 8व्या दिवशी 656 कोटींची विक्री; एकूण 5,430 कोटींची नेट सेलिंग
DIIs: सलग 71व्या दिवशी 2,542 कोटींची खरेदी
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय तांदळावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय राईस एक्सपोर्ट सेक्टरसाठी हे मोठे आव्हान बनू शकते.
चांदी: 1,700 रुपयांनी घसरून 1,81,800 च्या खाली
सोने: 500 रुपयांची घसरून, 1,30,000 च्या खाली
कच्चे तेल: 2% घसरून 63 डॉलरच्या खाली
4,500 पेक्षा जास्त फ्लाइट रद्द झाल्यानंतर DGCA Indigo वर कडक कारवाई करण्याची शक्यता आहे. कंपनीने पाठवलेल्या नोटिशीचे प्रत्युत्तर दिले असून आज CEO ची चौकशी आणि संसदेत विमान वाहतूक मंत्र्यांचे निवेदन अपेक्षित आहे.
Fujiyama Power: नफ्यात दुप्पट वाढ
PhysicsWallah: 62% नफ्यात वाढ
ICICI Bank: ICICI Prudential AMC मधील 2% हिस्सा विकत घेणार
Siemens: Low Voltage Motors बिझनेस 2400 कोटींना विकणार
Corona Remedies IPO: पहिल्या दिवशी 62% सबस्क्रिप्शन
WakeFit IPO: फक्त 15% सबस्क्रिप्शन