Stock Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1,500 अंकांनी कोसळला, निफ्टी 22,300च्या खाली

Stock Market Today: जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1500 अंकांनी पडला, तर निफ्टी 22,300 च्या खाली गेला.
Stock Market Crash
Stock Market CrashPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आज (2 एप्रिल) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 1,500 अंकांनी घसरला, तर निफ्टी 22,300 च्या खाली गेला.

जागतिक तणावाचा थेट परिणाम

या घसरणीमागचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेला भू-राजकीय तणाव. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली असून बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे.

GIFT निफ्टी आणि आशियाई बाजारातही घसरण

GIFT निफ्टी सुमारे 340 अंकांनी खाली होता, ज्यामुळे भारतीय बाजारात कमकुवत सुरुवातीचे संकेत मिळाले होते. जपानचा निक्केई निर्देशांकही 1000 अंकांनी घसरला, तर इतर आशियाई बाजारांमध्येही मोठी घसरण दिसून आली.

Stock Market Crash
Cook Dilip Salary: साधा कुक नाही, तर हाय-प्रोफाइल शेफ! फराह खानसोबत काम करणाऱ्या दिलीपची सॅलरी किती?

कच्च्या तेलात वाढ, महागाईची चिंता

कच्च्या तेलाच्या किमती $105 च्या वर गेल्यामुळे महागाई आणि चालू खात्याच्या तुटीबाबत चिंता वाढली आहे. ऊर्जा दर वाढल्याने अर्थव्यवस्थेवर दबाव येण्याची शक्यता असल्याने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे.

FIIs ची सतत विक्री

परदेशी गुंतवणूकदार (FIIs) सलग 22व्या दिवशी विक्री करत आहेत. गेल्या 24 दिवसांत फक्त 2 दिवस खरेदी झाली आहे, ज्यामुळे बाजारावर दबाव कायम आहे. आजच्या घसरणीत PSU बँक आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्स टॉप लूझर्स ठरले. गुंतवणूकदारांनी या सेक्टर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचं दिसून आलं.

Stock Market Crash
Sovereign Gold Bonds | सोनेरी गुंतवणुकीला टॅक्सचा 'शॉक'! १ एप्रिलपासून गोल्ड बाँड घेणाऱ्यांना भरावा लागणार कर

रुपया कमकुवत, गुंतवणूकदार सावध

रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असून अलीकडेच त्याने ऐतिहासिक नीचांक गाठला आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला आहे.

एकीकडे जागतिक तणाव, वाढलेले तेलाचे दर आणि FIIs ची विक्री, तर दुसरीकडे कमकुवत जागतिक संकेत, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसत आहे. आजच्या घसरणीमुळे बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news