

Farah Khan cook Dilip Salary: बॉलिवूड दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने यूट्यूबच्या माध्यमातून डिजिटल दुनियेत एंट्री केल्यापासून त्यांच्या कुक दिलीपचं नावही चर्चेत आलं आहे. त्यांच्या व्लॉगमध्ये दिलीपची साधी शैली प्रेक्षकांना खूप आवडत असून तो आता सोशल मीडियावर लोकप्रिय चेहरा बनला आहे.
दिलीपच्या कामाइतकंच त्याच्या पगाराबाबतही लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. एका व्हिडिओत फराह खान मजेत त्याच्या सॅलरीबद्दल बोलताना दिसल्या. त्यांनी एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की दिलीप गेल्या 11 वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत आहे. सुरुवातीला त्याला 20,000 रुपये पगार मिळत होता. मात्र सध्या तो किती कमावतो, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.
अलीकडे फराह खान कृष्णा श्रॉफ यांच्या बांद्रा येथील घरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मजेत दिलीपला सांगितलं की त्याचा पगार आता 50 झाला असेल. दिलीपने याचा अर्थ 50,000 हजार असा घेतला आणि तो आश्चर्यचकित झाला. त्यावर फराहने लगेच स्पष्ट केलं की तो फक्त विनोद होता. या मजेशीर संवादामुळे व्लॉग आणखी रंगतदार झाला.
या व्लॉगमध्ये जॅकी श्रॉफ, आयेशा श्रॉफ आणि टायगर श्रॉफ यांच्या कुटुंबातील घराची झलकही पाहायला मिळाली. घराचं इंटीरियर साधं पण आकर्षक आहे. पांढऱ्या रंगाचा वापर, लाकडी फ्लोअरिंग आणि निवडक आर्टवर्क यामुळे घराला एलिगंट लुक मिळाला आहे. विशेष म्हणजे, घरात प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या पेंटिंग्सही लावण्यात आल्या आहेत. कृष्णा श्रॉफ यांनी सांगितलं की त्यांनी हे घर आपल्या आईसोबत डिझाइन केलं आहे.
दिलीप आता फक्त ‘कुक’ राहिलेला नाही, तर एक हाय-प्रोफाइल शेफ म्हणून त्याची ओळख तयार होत आहे. त्याचा साधेपणा, कामाची शैली आणि फराह खानसोबतची केमिस्ट्री यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियामुळे अनेक सामान्य लोकही लोकप्रिय होऊ शकतात, याचं दिलीप हे उत्तम उदाहरण आहे.