Stock Market Opening Bell
शेअर बाजारात मंगळवारी चढ-उतार दिसून आला.(File Photo)

Stock Market Closing | शेअर बाजारात चढ-उतार; 'या' शेअर्समध्ये विक्री

सेन्सेक्स- निफ्टी किरकोळ वाढीसह बंद झाले
Published on

Stock Market Closing Updates

भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि. १ जुलै) चढ-उतार दिसून आला. आजच्या सत्रात सेन्सेक्स- निफ्टी किरकोळ वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स ९० अंकांनी वाढून ८३,६९७ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २४ अंकांच्या वाढीसह २५,५४१ वर स्थिरावला. भारत- अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय टॅरिफ मुद्यावरील चर्चेचा बाजारात परिणाम दिसून येत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

क्षेत्रीय निर्देशांकातही संमिश्र व्यवहार दिसून आला. पीएसयू बँक निर्देशांक ०.७ टक्के वाढला. त्याचसोबत इन्फा आणि मेटल निर्देशांकातही तेजी राहिली. तर दुसरीकडे निफ्टी मीडिया १.५ टक्के घसरला. एफएमसीजी, आयटी आणि ऑटो निर्देशांकही घसरला. बीसएई मिडकॅप आणि स्मॉलकॅप किरकोळ घसरणीसह बंद झाले. या दोन्ही निर्देशांकात सलग ७ दिवस तेजी राहिली होती.

Stock Market Opening Bell
Mutual Fund | म्युच्युअल फंड अडचणीत आल्यास आपले पैसे परत मिळतील का ?

सेन्सेक्सवर भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर्स २.५ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर रिलायन्स, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. कोटक बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टायटन, भारती एअरटेल हे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले. तर दुसरीकडे ॲक्सिस बँक, ट्रेंट, इर्टनल, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, सन फार्मा हे शेअर्स ०.५ टक्के ते २ टक्क्यांपर्यंत घसरले.

Stock Market Opening Bell
काय आहे UPS एकात्मिक पेन्शन योजना ?

बाजारात पुन्हा टॅरिफची चिंता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य टॅरिफ लागू करण्याबाबत ९ जुलैची डेडलाईन दिली आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध दिसून आले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारताकडून या आठवड्यात अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय करारावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news