

Stock Market Closing Updates
इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव कमी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.२५ जून) सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा माहौल राहिला. सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढून (०.८ टक्के वाढ) ८२,७५५ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०० अंकांनी वाढून २५,२४४ वर स्थिरावला. मुख्यतः आयटी, ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स सर्वाधिक तेजीत राहिले.
मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणाव कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारांत तेजीचे वातावरण राहिले.
निफ्टी आयटी १.६ टक्के वाढला. तर निफ्टी ऑटो जवळपास १ टक्के वाढून बंद झाला. निफ्टी ५० वर टायटन ३.६ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. एम अँड एम, ग्रासीम हे प्रत्येकी २ टक्के वाढले. इन्फोसिस १.९ टक्के आणि जेएसडब्ल्यू स्टील १.७ टक्के वाढून बंद झाला. तर भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर्स २.९ टक्के घसरला. कोटक बँक, आयशर मोटर्स ०.९ टक्के, ओएनजीसी, ॲक्सिस बँक हे शेअर्स प्रत्येकी ०.८ टक्के घसरले.
सेन्सेक्सवरील ३० पैकी २७ शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. त्यात टायटन, इन्फोसिस, एम अँड एम, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, टीसीएस, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, इर्टनल, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, मारुती, रिलायन्स या शेअर्संचा समावेश आहे.
दुसरीकडे बीएसई मिडकॅप ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप १.५ टक्के वाढून बंद झाला.