Gold Rate Today | सोने दरात बदल, जाणून घ्या आजचा १८ ते २४ कॅरेटचा दर

मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्याने सोने- चांदी दरात घट झाली आहे
Gold Rate Today
Gold Rate Today(Pudhari Photo)
Published on
Updated on

Gold Rate Today

इस्रायल- इराण यांच्यातील युद्धबंदीनंतर मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोने- चांदी दरात किचिंत घट झाली आहे. बुधवारी (दि. २५ जून) शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर ११२ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम ९७,१५१ रुपयांवर खुला झाला. मंग‍ळवारी २४ कॅरेटचा दर ९७,२६३ रुपयांवर बंद झाला होता. त्यात आज किचिंत घट झाली.

तर चांदीच्या दरात ३१७ रुपयांची घट झाली आहे. चांदी दर प्रति किलो १,०५,६५० रुपयांवर खुला झाला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७,१५१ रुपये, २२ कॅरेट ८८,९९० रुपये, १८ कॅरेट ७२,८६३ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ५६,८३३ रुपयांवर खुला झाला आहे.

Gold Rate Today
loans : गरज नसताना कर्ज घेण्याचे धोके

इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात २ टक्के घसरण झाली. स्पॉट गोल्ड दर प्रति औंस ३,३१६.८० डॉलरपर्यंत खाली आला. मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्याने सोन्याची सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी कमी झाली. परिणामी दर घसरल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इस्रायल-इराणच दरम्यानच्या युद्धादरम्यान सोन्याचा दर १ लाख पार झाला होता.

Gold Rate Today
Stock Market Updates | बाजार पुन्हा तेजीच्या महामार्गावर!

सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

ग्राहकांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चे हॉलमार्क असलेले सर्टिफाइड सोने खरेदी करायला हवे. प्रत्येक सोन्याच्या दागिन्यावर ६ अंकी हॉलमार्क कोड असतो. त्याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर अर्थात HUID असेही म्हटले जाते. हा नंबर AZ4524 असा असतो. यातून हॉलमार्कची सत्यता आणि सोन्याची शुद्धता म्हणजे ते किती कॅरेट आहे हे कळण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news