Stock Market Closing | बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स पुन्हा ८४ हजार पार

जाणून घ्या कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी?
Stock Market Closing Updates
Stock Market Closing Updates (Pudhari Photo)
Published on
Updated on

Stock Market Closing Updates

जागतिक सकारात्मक संकेत आणि स्थिर विदेशी गुंतवणुकीबाबतच्या आशावादामुळे शुक्रवारी (दि.२७ जून) भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी राहिली. सेन्सेक्स (Sensex) ३०३ अंकांनी वाढून ८४,०५८ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty 50) ८८ अंकांच्या वाढीसह २५,६३७ वर स्थिरावला.

निफ्टी बँकचा नवा उच्चांक

बँकिंग शेअर्समध्ये वाढ झाल्याने निफ्टी बँक निर्देशांकाने सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टी बँकने पहिल्यांदाच ५७,४०० चा टप्पा पार केला. निफ्टी बँक ५७,४४३ वर बंद झाला.

Stock Market Closing Updates
loans : गरज नसताना कर्ज घेण्याचे धोके

'या' शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी

विशेषतः ऑईल आणि गॅस, मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. यामुळे बाजाराचा आठवड्याचा शेवट जोरदार वाढीसह झाला. निफ्टी ऑईल अँड गॅस निर्देशांक १.२ टक्के वाढला. त्यासोबतच निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जी निर्देशांकही वधारले. पीएसयू बँक, फार्मा, मेटल आणि मीडिया निर्देशांकातही तेजी दिसून आली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक सलग सहाव्या दिवशी वाढून बंद झाला.

इस्रायल-इराण यांच्यातील युद्धबंदीमुळे मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणाव कमी झाला आहे. तसेच संभाव्य अमेरिका- भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराबद्दल आशावाद हे घटक बाजारातील तेजीसाठी महत्त्वाचे ठरले.

Stock Market Closing Updates
Equity Mutual Funds | ‘इक्विटी म्युच्युअल फंड’मध्ये गुंतवणूक करताना...

सेन्सेक्सवर एशियन पेंट्सचा शेअर्स सर्वाधिक ३ टक्के वाढला. अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा, एसबीआय हे शेअर्स १ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर ट्रेंट, इर्टनल, टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, टायटन हे शेअर्स घसरले.

निफ्टी ५० वर जिओ फायनान्सियल शेअर्स (Jio Financial share) सर्वाधिक ३.८ टक्के वाढला. एशियन पेंट्स ३.१ टक्के, अपोलो हॉस्पिटल २.९ टक्के, इंडसइंड बँक २.८ टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर्स २.४ टक्के वाढून बंद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news