Real Estate Market: रिअल इस्टेटचा ‘गोल्डन टाइम’ सुरु झालाय; जगभरातील दिग्गज कंपन्यांची भारतात एन्ट्री

India’s Real Estate Boom: भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूक विक्रमी वेगाने वाढत आहे. जपान, अमेरिका आणि आशियातील मोठे गुंतवणूकदार अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करत आहेत.
Real Estate Market
Real Estate MarketPudhari
Published on
Updated on

Foreign Investment in Indian Real Estate: भारतातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. आशियातील मोठ्या अर्थव्यवस्थांपेक्षा जास्त स्थिरता, मागणीतील वाढ, तसेच विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधा यामुळे भारत जागतिक गुंतवणूकदारांसाठी ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. जपान, अमेरिका आणि इतर आशियाई देशांतील मोठे गुंतवणूकदार आता अब्जावधी रुपये भारतीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यास उत्सुक आहेत.

भारतात जपानी कंपन्यांची वाढती गुंतवणूक

मित्सुई फुदोसान

रॉयटर्सच्या माहितीनुसार, जपानची सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी मित्सुई फुदोसान भारतात 30–35 अब्ज येन (₹1,600–₹1,900 कोटी) एवढी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. 2020 मध्ये बेंगळुरूमधील आरएमझेडसोबत भागीदारी करून ऑफिस प्रोजेक्टमधून त्यांनी भारतीय बाजारात एन्ट्री केली होती.

सुमितोमो रिअल्टी

याच बरोबर जपानची तिसऱ्या क्रमांकाची कंपनी सुमितोमो रिअल्टीने मुंबईत तब्बल $6.5 अब्ज येनच्या (सुमारे ₹ 374.4 कोटी) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या आसपास ते जमिनीच्या शोधात असल्याची माहितीही समोर आली आहे.

मित्सुई O.S.K लाइन्सची उपकंपनी डायबिरू कॉर्पने गेल्या वर्षी दोन शहरांमध्ये ऑफिस प्रोजेक्ट सुरू केले असून आता निवासी इमारती आणि डेटा सेंटरचेही नियोजन सुरू आहे.

जपानच नाही अमेरिका देखील मोठी गुंतवणूक करत आहे

ब्लॅकस्टोन

अमेरिकेची इन्व्हेस्टमेंट कंपनी ब्लॅकस्टोन भारतातील सर्वात मोठी कमर्शियल कंपनी असून त्यांच्या $50 अब्ज (सुमारे ₹ 4.47 लाख कोटी) मालमत्तेपैकी अर्धी रक्कम भारतात आहे.

ET च्या अहवालानुसार, नवीन फंड्स, ऑफिस प्लॅटफॉर्म्स आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागामुळे 2026 पर्यंत भारतीय रिअल इस्टेट प्रचंड वेगाने विस्तारणार आहे.

भारतीय रिअल इस्टेटमध्ये परदेशी गुंतवणूक का वाढतेय?

1. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि शहरीकरण

भारताची वाढती लोकसंख्या, नोकऱ्यांच्या वाढत्या संधी आणि मोठ्या शहरांतील मागणी ही गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे.

2. तिन्ही प्रमुख क्षेत्रांमध्ये जबरदस्त मागणी

हाउसिंग, ऑफिसेस आणि गोदामांना जागतिक स्तरावरही वाढती मागणी आहे.

3. स्थिर आणि सुरक्षित रिटर्नस्

रिअल इस्टेटमध्ये महागाईपासून संरक्षण (inflation hedge) मिळते.

4. REITs, IPOs आणि मजबूत कॅपिटल मार्केट

यामुळे गुंतवणूक करणे अधिक सोपे आणि पारदर्शक झाले आहे.

Real Estate Market
Companies Shut Down: धक्कादायक! पाच वर्षांत 2 लाखांहून अधिक खासगी कंपन्या बंद; सरकारचा लोकसभेत मोठा खुलासा

नवीन क्षेत्रांमध्येही गुंतवणूक वाढली

आता गुंतवणूक पारंपरिक मालमत्तेपलीकडे पुढील क्षेत्रांत वाढत आहे —

  • डेटा सेंटर्स

  • लॉजिस्टिक पार्क

  • इंडस्ट्रियल हब्स

  • सीनियर लिव्हिंग

  • लँड बँकिंग

  • बिल्ड-टू-कोर प्रोजेक्ट्स

सरकारी आकडेवारीनुसार, 2024 मध्ये इंडस्ट्रियल व वेअरहाउसिंग गुंतवणूक 190% ने वाढली आहे.

Colliers Investor Outlook 2026 नुसार, गुंतवणूकदार आता आशिया-पॅसिफिककडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत आणि भारत हा सर्वात चांगला बाजार मानला जातो. APAC (Asia-Pacific) मधील कॅपिटल रायझिंग 2024 पासून 130% ने वाढले, ज्यातील मोठा हिस्सा भारताकडे आहे.

Real Estate Market
Mega Bank Merger: तुमची बँक बंद होणार? लहान बँकांना लागणार कुलूप; IFSC, खाते क्रमांक... काय काय बदलणार?

Colliers India चे CEO बादल याग्निक म्हणतात की, “भारत हा APAC मधील सर्वात स्थिर, जास्त वाढ देणारा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम बाजार आहे.” 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांतच 4.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक आली आहे आणि 2026 मध्ये हा आकडा आणखी वाढेल असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news