Silver Price: पुढील 24 तासांत चांदीचे भाव 3 लाखांच्या वर जाणार? भाव वाढीमागील 8 प्रमुख कारणे कोणती?

Silver Price 3 Lakh: जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकेतील महागाईचा डेटा आणि व्याजदर कपातीच्या चर्चांमुळे चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजारात चांदीचे दर आधीच 2.75 लाखांच्या पुढे गेले आहेत.
Silver Price 3 Lakh
Silver Price 3 LakhPudhari
Published on
Updated on

Silver Price 3 Lakh: चांदीच्या भावात सध्या मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कारण येणारे पुढील 24 ते 36 तास चांदीसाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील वायदा बाजारात चांदीचे दर आधीच 2 लाख 75 हजार रुपयांच्या पुढे गेले असून, भाव काही वेळातच 2 लाख 80 हजारांच्या जवळपास पोहोचले होते. त्यामुळे आता 3 लाख रुपयांचा टप्पा गाठण्याचा मार्ग जवळ आला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जर आज दरांमध्ये 10 ते 15 हजार रुपयांची आणखी वाढ झाली, तर बाजार बंद होईपर्यंत चांदी 3 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठू शकते. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात आतापर्यंत चांदीच्या दरात सुमारे 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. काही दिवसांत तर दर 5 टक्क्यांहून अधिक वाढल्याचेही दिसून आले.

दरवाढीमागची जागतिक संकेत

चांदीच्या दरवाढीमागे अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत ठरत आहेत. अमेरिकेतील डिसेंबर महिन्याची महागाई 2.7 टक्के इतकी झाली आहे. ही आकडेवारी अपेक्षेप्रमाणे असल्याने अमेरिकेची मध्यवर्ती बँक (फेडरल रिझर्व्ह) लवकरच व्याजदर कपातीचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वाढली आहे. याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर होत असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी दोन्ही तेजीत आहेत.

त्यातच अमेरिकेतील फेड आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संघर्ष वाढत आहे. ट्रम्प यांनी फेडच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय अस्थिरता वाढली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात आणि त्याचा फायदा चांदीला होण्याची शक्यता आहे.

टॅरिफ, कोर्टाचे निर्णय आणि वाढता तणाव

15 जानेवारीला अमेरिकेत टॅरिफसंबंधी महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय अपेक्षित आहे. हा निर्णय ट्रम्प यांच्या बाजूने गेला, तर बाजारात अस्थिरता वाढू शकते. तसेच रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर 500 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याच्या चर्चेमुळेही गुंतवणूकदारांमध्ये चिंता आहे.

याशिवाय इराण, व्हेनेझुएला, क्यूबा, कंबोडिया यांसारख्या देशांबाबत अमेरिकेची वाढती आक्रमक भूमिका, तसेच रशिया-युक्रेन संघर्ष सुरूच असल्याने जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा काळात चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांना मोठा आधार मिळतो.

Silver Price 3 Lakh
Bank of Baroda: खात्यातून लाखो रुपये अचानक गायब; बँक ऑफ बडोदामध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार; ग्राहकांमध्ये खळबळ

गोल्ड-सिल्व्हर रेशो आणि औद्योगिक मागणी

सध्या गोल्ड-सिल्व्हर रेशो 13 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. जर हा रेशो आणखी खाली आला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 100 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. असे झाल्यास भारतात चांदीचे दर थेट 3 लाख रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय चांदीची औद्योगिक मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषतः सौरऊर्जेच्या क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर चांदीचा वापर होणार आहे. संशोधनानुसार पुढील काही वर्षांत सोलर पॅनेलसाठी चांदीची मागणी इतकी वाढेल की सध्याच्या साठ्यांवर मोठा ताण येईल.

रुपयाची घसरणही कारणीभूत

डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याने आयात होणारी चांदी महाग होत आहे. याचा थेट परिणाम देशांतर्गत दरांवर दिसून येतो. सध्या रुपया 90च्या आसपास असून, गेल्या वर्षभरात त्यात मोठी घसरण झाली आहे.

Silver Price 3 Lakh
New Income Tax Act: 1 एप्रिलपासून नवीन इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट लागू होणार; सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

तज्ज्ञांचे मत काय?

बुलियन मार्केटमधील जाणकारांच्या मते, सध्याची सर्व परिस्थिती चांदीच्या दरवाढीस पोषक आहे. जागतिक राजकीय तणाव, व्याजदर कपातीची शक्यता, औद्योगिक मागणी आणि चलनातील अस्थिरता, हे सर्व घटक एकत्र आले तर चांदीचा दर 3 लाख रुपयांपर्यंत पोहचू शकतो. एकूणच पुढील काही तास चांदीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, गुंतवणूकदारांची नजर या घडामोडींवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news