Silver Investment: कमी पैशांत चांदीत गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या सोपे मार्ग

Silver Investment Options Explained: महागाई आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार चांदीकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत आहेत. आज फिजिकल सिल्व्हरसोबतच सिल्व्हर ETF आणि डिजिटल सिल्व्हरमुळे कमी पैशांतही गुंतवणूक करणे शक्य झाले आहे.
Silver Investment Options
Silver Investment Options Pudhari
Published on
Updated on

Silver Investment Options Explained: महागाई वाढत असताना आणि शेअर बाजारात सतत चढ-उतार सुरू असताना, अनेक गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहेत. अशा काळात चांदी ही केवळ दागिने किंवा औद्योगिक धातू न राहता एक विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय आहे. विशेष म्हणजे आज चांदीत गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम लागत नाही. कमी पैशांतही विविध पर्यायांद्वारे गुंतवणूक करता येते.

गेल्या काही वर्षांत जागतिक अनिश्चितता, महागाई आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात वाढलेली मागणी यामुळे चांदीचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांदीचा समावेश करत आहेत.

फिजिकल सिल्व्हर

चांदीत गुंतवणुकीचा सर्वात जुना मार्ग म्हणजे फिजिकल सिल्व्हर. यात नाणी, बार किंवा दागिन्यांच्या स्वरूपात चांदी खरेदी केली जाते. याचा मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदाराकडे प्रत्यक्ष संपत्ती असते. मात्र, यामध्ये साठवणूक, सुरक्षितता, मेकिंग चार्ज आणि शुद्धतेची खात्री यासारख्या बाबी लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यामुळे नेहमी विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच चांदी खरेदी करणं महत्त्वाचं ठरतं.

सिल्व्हर ETF : सोपा आणि पारदर्शक पर्याय

ज्यांना फिजिकल चांदीची झंझट नको आहे, त्यांच्यासाठी सिल्व्हर ETF हा उत्तम पर्याय आहे. हे शेअर बाजारात ट्रेड होणारे फंड असतात, जे थेट चांदीच्या किमतींशी जोडलेले असतात. यात साठवणुकीची चिंता नसते आणि व्यवहार पारदर्शक असतो. कमी खर्च आणि सहज खरेदी-विक्रीची सुविधा असल्यामुळे नव्या तसेच अनुभवी गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय चांगला आहे.

Silver Investment Options
Supriya Sule: सुप्रिया सुळेंना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद? राज्यात अजित पवारच ‘दादा', इनसाइड स्टोरी समोर

डिजिटल सिल्व्हर : कमी पैशांत गुंतवणुकीची संधी

आजकाल डिजिटल सिल्व्हर लोकप्रिय होत आहे. मोबाईल अ‍ॅप्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अगदी कमी रकमेपासूनही चांदीत गुंतवणूक करता येते. खरेदी केलेली चांदी सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवली जाते आणि गरज असल्यास तिची प्रत्यक्ष डिलिव्हरीही मिळू शकते. विशेषतः लहान गुंतवणूकदारांसाठी हा मार्ग अतिशय सोयीचा मानला जातो.

सिल्व्हर बाँड आणि इतर पर्याय

काही वित्तीय संस्थांकडून सिल्व्हर बाँडसारखी उत्पादनेही दिली जातात, जी चांदीच्या किमतींवर आधारित असतात. याशिवाय कमोडिटी बाजारात चांदीचे फ्युचर्स आणि ऑप्शन्स उपलब्ध आहेत. मात्र, हे पर्याय तुलनेने अधिक जोखमीचे असल्याने त्यात गुंतवणूक करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

Silver Investment Options
Silver Price Forecast: चांदीचा भाव 6 लाख रुपयांपर्यंत जाणार? रॉबर्ट कियोसाकी यांनी केलं मोठं भाकीत; गुंतवणूक करावी का?

योग्य नियोजन महत्त्वाचं

एकूणच चांदीत गुंतवणूक करण्यासाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदारांनी आपली जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी आणि सोय यांचा विचार करून योग्य मार्ग निवडायला हवा. समजून-उमजून केलेली चांदीतील गुंतवणूक पोर्टफोलिओला चांगला आधार देऊ शकते आणि दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news