

Gold Rates Rise, Silver Hits Record High on MCX: आज चांदीच्या किमती पहिल्यांदाच प्रति किलो 2 लाख रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. या वर्षी चांदीच्या किमती 121 % वाढल्या आहेत. आज व्यवहारादरम्यान एमसीएक्सवर चांदीचा भाव 2,00,362 रुपयांवर पोहोचला. 5 मार्चच्या डिलिव्हरीसाठी चांदी मागील सत्रात 1,98,942 रुपयांवर बंद झाली आणि आज थोडीशी घसरण होऊन 1,96,958 रुपयांवर उघडली. पण आता भाव अचानक वाढले आहेत.
दुपारी 3.00 वाजता, चांदीचा भाव 1036 रुपयांनी किंवा 0.52 % वाढून 1,99,978 रुपयांवर व्यवहार करत होता. गुरुवारी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चांदीच्या किमती प्रति औंस 64 डॉलरच्या पुढे गेल्या. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या किमती वाढल्या आहेत. सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये याचा वापर केला जातो. यामुळे मागणी वाढत आहे आणि त्यामुळेच चांदी रोज नवीन विक्रम करत आहे.
आज सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली. एमसीएक्सवर 5 फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव जवळपास 2,000 रुपयांनी वाढला. मागील सत्रात तो 1,32,469 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला आणि आज तो 1,32,442 रुपयांवर उघडला. व्यवहारादरम्यान तो 1,34,111 रुपयांवर पोहोचला. दुपारी 3:10 वाजता तो 1,281 रुपयांनी वाढून 1,33,750 रुपयांवर व्यवहार करत होता.
विशेषतः आर्थिक अस्थिरता आणि डॉलर निर्देशांकातील घसरण यामुळे-
सोने-चांदी दोन्हींच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे
औद्योगिक मागणी कायम राहिल्यास चांदीचे भाव नवीन विक्रम करु शकतात
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हा तेजीचा ट्रेंड आगामी काही आठवड्यांत कायम दिसू शकतो.