

पुणे : अमेरिकन व्याजदरातील कपात, जागतिक व्यापारातील अस्थिरता, मध्यवर्ती बँकांची सोन्यात वाढलेली गुंतवणूक यामुळे सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. चांदीचा दर किलोमागे दोन लाख रुपयांच्या दिशेने जाऊ लागला आहे.
वस्तू आणि सेवा करासह (जीएसटी) गुरुवारी चांदीचा दर किलोमागे 1 लाख 93 हजार 640 रुपयांवर गेला आहे. दिवसभरात चांदीच्या दरात चार ते पाच हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
तर, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग््रॉमचा भाव जीएसटीसह 1 लाख 32 हजार 355 रुपयांवर गेला असून, 22 कॅरेटचा दर 1 लाख 21 हजार 540 रुपये झाला आहे. सराफा व्यावसायिक वस्तूपाल रांका यांनी ही माहिती दिली.