ऐतिहासिक टप्प्यावर भारतीय शेअर बाजार

ऐतिहासिक टप्प्यावर भारतीय शेअर बाजार

[author title="भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि." image="http://"][/author]

27 मे रोजी निफ्टीचा 23110.80 हा उच्चांक 30 मे रोजी 22417 हा सप्ताहातील नीचांक आणि अंतिमतः सप्ताहाच्या अखेरीस 22530.70 वर बंद! म्हणजे पूर्ण आठवडा 600 पॉईंटस्च्या चढ-उतारामध्ये व्यतीत झाला. शुक्रवार, दि. 31 मे रोजी Monthly expiry देखील होती. त्यामुळे पूर्ण महिन्याचा विचार केला, तर निफ्टी केवळ अर्धा टक्का घसरला. म्हणजे केवळ 110 पॉईंटस्ची मंदी!

4 जून रोजी म्हणजे मंगळवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल असल्यामुळे निकालांच्या तोंडावर ही Volatility बाजारात राहणे, हे ओघानेच येते. तसे पाहायला गेले, तर गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स यांच्यापेक्षा बिझिनेस चॅनेल्सवर किंवा यूट्यूबवर तथाकथित बाजारतज्ज्ञांचा जो धुमाकूळ गेले महिनाभर सुरू आहे, तो पाहता हे बाजार तज्ज्ञ गुंतवणूकदारांना योग्य ज्ञान देण्याऐवजी एकतर त्यांना मोठ्या लाभाची लालच दाखवत होते किंवा बाजार कोसळण्याची भीती दाखवत होते.

निवडणुका, नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे बाजारात येणारे चढ-उतार हे तात्पुरते असतात. बाजार वाढत राहतो तो शेअर्सच्या भावांमध्ये होणार्‍या वाढीमुळे आणि शेअर्सचे भाव वाढतात ते कंपन्यांचे Earnings आणि Future Growth मुळे. उदाहरणच द्यायचे तर NCC या कन्स्ट्रक्शन कंपनीने 15 मे रोजी आपले आर्थिक निकाल सादर केले. YOY धर्तीवर 30 टक्के Revenue growth, साडेसतरा टक्के Operating Income मध्ये वाढ, तर निव्वळ नफ्यात वाढ 25 टक्के! हे झाले दमदार Earnings कंपनीच्या Future Growth विषयी! तर, कंपनीकडे 57536 कोटी रुपयांच्या Work Orders आहेत शिवाय आणखी 20 ते 22,000 कोटी रुपयांच्या Work Orders अपेक्षित आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणावर ज्या कंपनीची वर्क ऑर्डर बुक आहे, त्या कंपनीच्या भविष्याविषयी वेगळे काय सांगायला हवे?
NCC बरोबरच Krsnaa Diagnostics, STS Enterprises यांचे देखील आर्थिक निकाल पाहा.
याउलट टाटा स्टीलच्या निव्वळ नफ्यात 65 टक्के घट होऊन तो 554.6 कोटी रुपयांवर आला.

भारताच्या Core Sector ची वाढ एप्रिल 2024 मध्ये 6.2 टक्के झाली जी मार्च 2024 मध्ये 6 टक्के होती. कोळसा कू्रड ऑईल, नैसर्गिक वायू, खनिज पदार्थ, खते, पोलाद, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटी या आठ क्षेत्रांचा Core Sector मध्ये समावेश होतो. देशाच्या IIT मध्ये (Index of industrial production) Core Sector चा 40.27 टक्के वाटा आहे.

NSE ने भारताचा पहिला Electric Vehide Index सुरू केला. The Nifty EV & New Age Automovtive असे त्याचे नाव असेल. इलेक्ट्रिक वाहने निर्माण करणार्‍या कंपन्या, त्यांचे पार्टस् बनवणार्‍या कंपन्या तसेच इलेक्ट्रिक वाहन उद्योगाशी संबंधित IT कंपन्या, केमिकल कंपन्या, कॅपीटल गुडस् कंपन्या, ऑईल आणि गॅस कंपन्या, आणि कंझ्युमर सर्व्हिसेस कंपन्या यांचा नवीन इंडेक्समध्ये समावेश असेल. वेटेजच्या अग्रक्रमानुसार या इंडेक्समधील टॉप टेन कंपन्या आणि त्यांचे वेटेज खालीलप्रमाणे आहे :

1) बजाज ऑटो 7.08 %
2) टाटा मोटर्स 6.49 %
3) महिंद्र आणि महिंद्र 5.83 %
4) मारुती सुझुकी 5.28 %
5) एक्साईड इंडस्ट्रीज 4.78 %
6) बॉश 4.56 %
7) संवर्धन मदरसन इंटरनॅशनल 4.45 %
8) आयशर मोटर्स 4.42 %
9) सी जी पॉवर 4.30 %
10) हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स 4.28 %

भारतीय शेअर बाजाराच्या द़ृष्टीने दोन सकारात्मक घटना, पहिली म्हणजे भारताचा GDP जानेवारी – मार्च 2024 या तिमाहीमध्ये 7.8 टक्क्यांनी वाढला, हीच वाढ मागील वर्षी 6.2 टक्के होती. दुसरी म्हणजे S & P Global Ratings ने भारताचे रेटिंग दहा वर्षांनी Stable वरून Positive केले. Macroeconomic reforms आणि fiscal discipline या गोष्टींमुळे हा दर्जा बदलण्यात आला. S & P ने भारताची GDP वाढ पुढील पाच वर्षांसाठी पुढीलप्रमाणे अपेक्षित केली आहे.

सन 2024 – 7.6 %
सन 2025 – 6.8 %
सन 2026 – 6.9 %
सन 2027 – 7.0 %
सन 2028 – 7.0 %

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news