Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी नव्या विक्रमी उच्चांकावर बंद

शेअर बाजारात आज काय घडलं?
Stock Market BSE Sensex
सेन्सेक्सने आज ७८ हजारांच्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

आशियाई बाजारातील तेजीचा मागोवा घेत आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीच्या जोरावर शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने मंगळवारी नवा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. सेन्सेक्सने आजच्या ट्रेडिंग सत्रात ७८,१६४ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. तर निफ्टी २३,७५४ वर पोहोचला. त्यानंतर सेन्सेक्स ७१२ अंकांनी वाढून ७८,०५३ वर बंद झाला. तर निफ्टी १८३ अंकांच्या वाढीसह २३,७२१ वर स्थिरावला.

Summary

बाजारात आज काय घडलं?

  • सेन्सेक्सचा ७८,१६४ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श.

  • निफ्टीने नोंदवला २३,७५४ चा सर्वकालीन उच्चांक.

  • निफ्टी बँक १.७ टक्क्यांनी वाढून ५२,६०६ वर बंद

  • निफ्टी रियल्टी १.७ टक्क्यांनी घसरला.

क्षेत्रीय निर्देशांकांत निफ्टी बँक आणि निफ्टी प्रायव्हेट बँक प्रत्येकी १.७ टक्क्यांनी वाढले. तर निफ्टी आयटी ०.८ टक्क्यांनी वाढला. निफ्टी रियल्टी १.७ टक्क्यांनी घसरला. निफ्टी मेटल आणि निफ्टी मीडिया अनुक्रमे ०.७ टक्के आणि ०.५ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.२ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप ०.०३ टक्क्यांनी घसरला.

Stock Market BSE Sensex
Stock Market Closing Bell | सेन्सेक्स तेजीत बंद, गुंतवणूकदारांनी कमावले १.२७ लाख कोटी

आजच्या ट्रेडिंग सत्रात स्मॉलकॅप्स आणि मिडकॅप्स उच्च पातळीवर खुले झाले होते. पण विक्रीच्या दबावामुळे ते खाली आले. निफ्टी रियल्टी टॉप लूजर ठरला. तर निफ्टी बँकेने नवीन उच्चांक गाठला.

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्स आज ७७,५२९ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ७८,१६४ चा नवा उच्चांक नोंदवला. सेन्सेक्सवर ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एलटी, टेक महिंद्रा, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एशियन पेंट, अदानी पोर्ट्स हे शेअर्स घसरले.

Stock Market Sensex
सेन्सेक्सवरील शेअर्सची स्थिती.BSE Sensex

श्रीराम फायनान्सची रॉकेट भरारी

निफ्टीने आज २३,७१० च्या उच्चांकी अंकाला स्पर्श केला. निफ्टीवर श्रीराम फायनान्स, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाईफ हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी वाढले. बीपीसीएल, आयशर मोटर्स, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, ओएनजीसी हे शेअर्स १ ते २ टक्क्यांदरम्यान घसरले.

NSE Nifty50
निफ्टी ५० चा ट्रेडिंग आलेख.NSE

Nifty Bank चा नवा उच्चांक

निफ्टी बँकने ५२,६६९ चा नवा उच्चांक गाठला. त्यानंतर निफ्टी बँक १.७ टक्क्यांनी वाढून ५२,६०६ वर बंद झाला. निफ्टी बँकवर ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर बंधन बँक शेअर्समध्ये घसरण झाली.

Stock Market BSE Sensex
आयकर : ‘रिटर्न’ भरूनही नोटीस आल्यास काय करावे?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news