Stock Market Updates | सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी उडाले

जाणून घ्या बाजारातील घसरणीची कारणे?
Stock Market Updates Sensex Nifty
जागतिक कमकुवत संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार शुक्रवारी कोसळला. file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

जागतिक कमकुवत संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार (Stock Market Updates) शुक्रवारी कोसळला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) ८०० अंकांनी घसरून ८१ हजारांवर आला. तर निफ्टी (Nifty) ५० निर्देशांक २८० अंकांनी घसरून २५ हजारांच्या खाली घसरला. सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवातीची घसरण प्रत्येकी सुमारे १ टक्के होती. बाजारात बँकिंग, आयटी आणि एनर्जी स्टॉक्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. क्षेत्रीय पातळीवर निफ्टी मेटल आणि पीएसयू बँक सुमारे २ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपही घसरला आहे.

दरम्यान, सकाळी १०.४५ वाजता सेन्सेक्स ६८६ अंकांच्या घसरणीसह ८१,१८१ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी २०० अंकांनी घसरून २४,८०० वर होता.

कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, मारुती यांचे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी घसरले आहेत. त्याचबरोबर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एलटी, इंडसइंड बँक, एसबीआय, टेक महिंद्रा, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, टायटन, एचसीएल टेक, एनटीपीसी हे शेअर्स घसरले आहेत. तर केवळ एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे शेअर्स वाढले आहेत.

निफ्टीवर टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, टाटा स्टील हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी घसरले आहेत. तर एचडीएफसी बँक, डिव्हिस लॅब, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स वाढले आहेत.

बाजारातील सुरुवातीच्या घसरणीमुळ‍े बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.२६ लाख कोटींनी कमी होऊन ४५७.३६ लाख कोटींवर आले.

Stock Market Updates Sensex Nifty
Stock Market Updates | Nifty चा नवा विक्रम! केवळ २४ ट्रेडिंग सत्रांत २४ हजारांवरून २५ हजारांवर

जागतिक कमकुवत संकेत

कमकुवत मॅन्युफॅक्चरिंग आकडेवारीमुळे अमेरिकेतील अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच फेडरल रिझर्व्हद्वारे संभाव्य व्याजदर कपातीची आशावाद कमी झाला आहे. यामुळे तेथील बाजारात काल विक्रीचा मारा दिसून आला. तसे आशियाई बाजारातील घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटले.

तेलाच्या किमतीत वाढ

मध्य पूर्वेतील मुख्य उत्पादन क्षेत्रातील संभाव्य पुरवठा अडथळ्याच्या चिंतेमुळे शुक्रवारी तेलाच्या किमतींत वाढ झाली. यामुळे ब्रेंट क्रूड फ्युचर्स ६२ सेंट्स किंवा ०.७५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ८०.१२ डॉलरवर गेले. मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव वाढला आहे. गेल्या तीन दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे २ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Stock Market Updates Sensex Nifty
Ola Electric IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी! प्राइस बँड किती? वाचा संपूर्ण डिटेल्स

मध्य पूर्वेत भू-राजकीय तणाव वाढला

मध्य पूर्वेत भू-राजकीय तणावही वाढला. इस्त्रायली सैन्याने गुरुवारी सांगितले की, हमासच्या लष्करी शाखेचा प्रमुख मोहम्मद देईफ गेल्या महिन्यात गाझा येथील इस्त्रायली हवाई हल्ल्यात ठार झाला. तसेच हमासचे राजकीय नेते इस्माईल हनीयेह यांच्या तेहरानमधील मृत्यूनंतर तणाव वाढला.

Stock Market Updates Sensex Nifty
मुलांसाठी ‘एनपीएस’ची नवी योजना, जाणून घ्या त्याविषयी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news