Share Market Today | सेन्सेक्स- निफ्टीची सलग चौथ्या सत्रात घसरण, पण BSE SmallCap तेजीत
पुढारी ऑनलाईन डेस्क
भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.२४) सलग चौथ्या सत्रांत घसरण कायम राहिली. सेन्सेक्स (Sensex) आज २८० अंकांनी घसरून ८०,१४८ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ६५ अंकांच्या घसरणीसह २४,४१३ वर स्थिरावला. आजच्या सत्रात २,४७४ शेअर्स वाढले. ९२७ शेअर्स घसरले. तर ८५ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. (Share Market Today)
ठळक मुद्दे
शेअर बाजारात बुधवारी सलग चौथ्या सत्रांत घसरण कायम.
सेन्सेक्स २८० अंकांनी घसरून ८०,१४८ वर बंद.
निफ्टी ६५ अंकांच्या घसरणीसह २४,४१३ वर स्थिरावला.
आजच्या सत्रात २,४७४ शेअर्स वाढले, ९२७ शेअर्स घसरले.
हेल्थकेअर, ऑईल आणि गॅस, मीडिया, पॉवर निर्देशांक तेजीत
एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण.
स्मॉलकॅप १.९ टक्क्यांनी वाढून बंद.
क्षेत्रीय आघाडीवर हेल्थकेअर, ऑईल आणि गॅस, मीडिया, पॉवर प्रत्येकी १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर एफएमसीजी आणि बँक निर्देशांक ०.५ ते १ टक्के घसरले. बीएसई मिडकॅप ०.६ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप (BSE SmallCap) १.९ टक्क्यांनी वाढून बंद झाला. (stock market news)
Stock Market : कोणते शेअर्स घसरले?
सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, अदानी पोर्ट्स, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक बँक, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले. तर टेक महिंद्रा, एनटीपीसी, टाटा मोटर्स, सन फार्मा, पॉवर ग्रिड हे शेअर्स तेजीत राहिले.
निफ्टीवर बजाज फिनसर्व्ह, टाटा कन्झ्यूमर, ब्रिटानिया, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स हे शेअर्स टॉप लूजर ठरले. तर एचडीएफसी लाईफ, टेक महिंद्रा, बीपीसीएल, एनटीपीसी, टाटा मोटर्स हे शेअर्स टॉप गेनर्स होते.
बजेटनंतर सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि.२३) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेंगमेंटवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली. त्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी असे दोन दिवस बाजारात घसरण झाली आहे. विशेषतः अर्थसंकल्पात भांडवली नफा कर वाढवल्यानंतर बँका आणि इतर फायनान्सियल शेअर्स घसरले आहेत. पण स्मॉलकॅप्स आणि मिडकॅप्स शेअर्समध्ये तेजी राहिली आहे.
ITC चा शेअर्स वधारला
ITC चा शेअर्स (ITC Share Price) गेल्या २ सत्रात जवळपास १० टक्क्यांनी वाढला आहे. या शेअर्सने आज BSE वर ५१० रुपयांचा नवीन उच्चांक नोंदवला. त्यानंतर हा शेअर्स ४९४ रुपयांवर स्थिरावला.
परदेशी गुंतवणूकदारांकडून (FII) विक्री
परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात पुन्हा विक्रीचा सपाटा सुरु केला आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २३ जुलै रोजी २,९७५ कोटी रुपयांच्या शेअर्स विक्री केली. तर याच दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी १,४१८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

