Gold Price Today | बजेटमधील एक घोषणा अन्‌ सोने ४ हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा दर

सोने खरेदीची सुवर्णसंधी
Gold Rate Today Gold Price Today
सोने- चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केल्याच्या घोषणेनंतर सोने सुमारे ४ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय अर्थसंकल्पातून सोने- चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केल्याच्या घोषणेनंतर सोने सुमारे ४ हजार रुपयांनी आणि चांदी ३,६०० रुपयांनी स्वस्त झाली. सरकारने सोने- चांदीवरील कस्टम ड्युटी १५ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर आणली आहे. यामुळे सोने, चांदी दरात घट झाली आहे. आज शुद्ध सोन्याचा दर (Gold Price Today) प्रति १० ग्रॅम ६९,१९४ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८४,८९७ रुपयांवर खुला झाला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज बुधवारी शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६९,१९४ रुपये, २२ कॅरेट ६३,३८२ रुपये, १८ कॅरेट ५१,८९ रुपये आणि १४ कॅरेचा दर ४०,४७९ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ८४,८९७ रुपयांवर आहे.

२२ कॅरेट सोने ३,१२८ रुपयांनी स्वस्त

२२ जुलै रोजी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६६,५१० रुपयांवर होता. पण अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर काल मंगळवारी २२ कॅरेटचा दर ६३,७५५ रुपयांपर्यंत खाली आला. याचाच अर्थ एका दिवसात २२ कॅरेट सोने २,७५५ रुपयांनी कमी झाले. आज पुन्हा २२ कॅरेट सोने ३७३ रुपयांनी स्वस्त झाले. दोन दिवसांत २२ कॅरेट सोन्याच्या दरात ३,१२८ रुपयांची घट झाली आहे.

Gold Rate Today Gold Price Today
Budget Highlights 2024 | केंद्रीय अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये : जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

MCX ‍वर सोने- चांदीचा दर काय?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) ५ ऑगस्ट डिलिव्हरी सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम ६८,७७१ रुपयांवर आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ८५ हजारांवर आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटीत कपात करण्याच्या घोषणेनंतर काल मंगळवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६८,५०० रुपयांपर्यंत खाली आला होता. यामुळे सोने प्रति १० ग्रॅममागे ४,२१८ रुपयांनी स्वस्त झाले होते.

Gold Rate Today Gold Price Today
Stock Market Updates | बजेटनंतर बाजारात घसरण कायम, बँकिंग शेअर्सवर दबाव

Gold Price Today : शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट (९९९) हे शुद्ध सोने समजण्यात येते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असा उल्लेख केलेला असतो. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Gold Rate Today Gold Price Today
Budget 2024 | रद्द केलेला Angel Tax काय आहे? याचा स्टार्टअपशी काय संबंध?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news