Stock Market Closing Bell | शेअर बाजारात दबाव कायम! सेन्सेक्स १०९ अंकांनी घसरून बंद

जाणून घ्या बाजारात आज काय घडलं?
Stock Market Closing Bell Sensex Nifty
सेन्सेक्स आज १०९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८०,०३९ वर स्थिरावला. तर निफ्टी २४,४०६ ‍‍वर बंद झाला.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

कमकुवत जागतिक संकेत, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेंगमेंटवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात दबाव कायम आहे. गुरुवारी सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) घसरण दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स ७९,४७७ पर्यंत खाली आला होता. पण त्यानंतर तो सावरला आणि सेन्सेक्स १०९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८०,०३९ वर स्थिरावला. तर निफ्टी २४,४०६ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell)

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६५० अंकांनी घसरून ७९,६०० च्या खाली आला होता. त्यानंतर तो सावरला आणि सपाट पातळीवर बंद झाला. तर बीएसई सेन्सेक्सने दिवसाच्या निचांकीवरून ५६० अंकांची रिकव्हरी केली. तर निफ्टीवर दिवसाच्या निचांकीवरून १९५ अंकांची रिकव्हरी दिसून आली.

Stock Market Closing Bell Sensex Nifty
Stock Market News Update | सेन्सेक्स- निफ्टी सलग पाचव्या सत्रात घसरले, जगभरातील बाजारही गडगडले

क्षेत्रीय निर्देशांकात ऑटोमध्ये सर्वाधिक वाढ

आज सुरुवातीला सर्वच क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आला. क्षेत्रीय निर्देशांकात ऑटो (NIFTY AUTO सर्वाधिक वाढला. ऑटोसह कॅपिटल गुड्स, पॉवर, ऑईल आणि गॅस, हेल्थकेअर, मीडिया ०.५ ते १ टक्के वाढले. तर बँक, आयटी, मेटल, रियल्टी आणि टेलिकॉममध्ये ०.५ ते १ टक्के घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप सुरुवातीच्या व्यवहारात घसरले होते. पण त्यानंतर त्यांनी रिकव्हरी केली. मिडकॅप ०.२ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.१ टक्के घसरणीसह बंद झाला.

ॲक्सिस बँकेचा शेअर्स ५ टक्क्यांनी घसरला

सेन्सेक्सवर ॲक्सिस बँकचा शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून १,१६० रुपयांच्या खाली आला. त्याचबरोबर नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, टायटन, टाटा स्टील, इंडसइंड बँक, आयटीसी हे शेअर्सही घसरले. तर टाटा मोटर्सचा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून १,०८६ रुपयांवर गेला. एलटी, सन फार्मा, कोटक बँक, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड हे शेअर्सही वाढून बंद झाले.

BSE Sensex
सेन्सेक्सवरील शेअर्सची आजची स्थिती.BSE
Stock Market Closing Bell Sensex Nifty
Budget 2024 | F&O ट्रेडिंग करणाऱ्यांना धक्का! STT वाढ घोषणेनंतर शेअर बाजारात पडझड

टाटा मोटर्सचा शेअर्स ६ टक्क्यांनी वाढला

निफ्टीवर ॲक्सिस बँक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, टायटन, टाटा स्टील हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. तर टाटा मोटर्स, ओएनजीसी, बीपीसीएल, एसबीआय लाईफ आणि एलटी हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. टाटा मोटर्सचा शेअर्स सुमारे ६ टक्के वाढून १,०८९ रुपयांवर बंद झाला.

NSE Nifty
निफ्टी ५० वरील आजचा ट्रेडिंग आलेख.NSE

आशियाई बाजारातही घसरण

आशियाई बाजारातील निर्देशांक आज गडगडले. एमएससीआयचा जागतिक स्टॉक्सचा सर्वात विस्तृत निर्देशांक १ टक्के खाली आला. तर जपानचा निक्केई ३.३ टक्क्यांनी घसरला.

Stock Market Closing Bell Sensex Nifty
Budget 2024 Updates Income tax |अर्थसंकल्पातून पगारदारांना मोठा दिलासा, आता १७,५०० रुपये आयकर वाचणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news