Stock Market News Update | सेन्सेक्स- निफ्टी सलग पाचव्या सत्रात घसरले, जगभरातील बाजारही गडगडले

सर्वच क्षेत्रात विक्रीचा दबाव
BSE Sensex
सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग पाचव्या सत्रात घसरणीसह खुले झाले आहेत.BSE

पुढारी ऑनलाईन डेस्क

कमकुवत जागतिक संकेत आणि इक्विटी गुंतवणूक नफा आणि डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगवर सरकारने केलेल्या कर वाढीचे पडसाद आज गुरुवारी (दि.२५) भारतीय शेअर बाजारात (Stock Market News Update) उमटले. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty50) आज सलग पाचव्या सत्रात घसरणीसह खुले झाले आहेत. सर्वच क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६५० अंकांनी घसरून ७९,६०० च्या खाली आला होता. त्यानंतर तो काही प्रमाणात सावरला. सकाळी १०.३० च्या सुमारास सेन्सेक्स ४७० अंकांच्या घसरणीसह ७९,७०० वर होता. तर निफ्टी १२५ हून अधिक अंकांनी घसरून २४,२७५ वर व्यवहार करत होता.

ॲक्सिस बँकेचा शेअर्स टॉप लूजर

सेन्सेक्सवर ॲक्सिस बँकेचा शेअर्स टॉप लूजर ठरला आहे. हा शेअर्स ६ टक्क्यांनी घसरून १,१६४ रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, टायटन, टाटा स्टील, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्सही घसरले आहेत. तर टाटा मोटर्सचा शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक वाढून टॉप गेनर ठरल आहे. एलटी, कोटक बँक, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेक हे शेअर्स तेजीत आहेत. बीएसई मिडकॅप ०.७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.२ टक्क्यांनी घसरला आहे.

BSE Sensex
Budget 2024 | रद्द केलेला Angel Tax काय आहे? याचा स्टार्टअपशी काय संबंध?

टाटा मोटर्सचा शेअर्स सर्वाधिक तेजीत

निफ्टीवर ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स, टायटन, टाटा स्टील हे शेअर्स घसरले आहेत. तर टाटा मोटर्स, ओएनजीसी, एसबीआय लाईफ, एलटी आणि अदानी एंटरप्रायजेस हे शेअर्स सर्वाधिक वाढून व्यवहार करत आहेत. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत.

जागतिक बाजारात परिस्थिती काय?

आशियाई बाजारातही घसरण झाली आहे. जपानचा निक्केई २.९ टक्क्यांनी तर दक्षिण कोरियाचा कोस्पी २ टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग ०.६ टक्क्यांनी खाली आला आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारातही काल मोठी घसरण दिसून आली होती. Nasdaq निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांनी घसरला. या निर्देशाकांची ही २०२२ नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे.

BSE Sensex
Budget 2024 | F&O ट्रेडिंग करणाऱ्यांना धक्का! STT वाढ घोषणेनंतर शेअर बाजारात पडझड

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news