Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, Paytm शेअर्स तेजीत, कारण काय?

जाणून घ्या बाजारात आज काय घडलं?
Stock Market Sensex Nifty
बीएसई आणि एनएसई.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारातही सोमवारी (दि.८) काही प्रमाणात कमकुवत स्थिती दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी आज सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ३६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,९६० वर स्थिरावला. तर निफ्टी २४,३२० वर बंद झाला. बँकिंग शेअर्समधील घसरण याला कारण ठरले. मुख्यतः आयसीआयसीआय बँक, टायटन, एचडीएफसी बँक या हेवीवेट शेअर्समधील घसरणीने बाजार सुस्त राहिला. दरम्यान, आज एफएमसीजी शेअर्समध्ये तेजी राहिली.

Summary

ठळक मुद्दे

  • शेअर बाजारात सुस्त स्थिती

  • सेन्सेक्स ३६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,९६० वर स्थिरावला.

  • निफ्टी २४,३२० च्या सपाट पातळीवर बंद.

  • एफएमसीजी शेअर्समध्ये तेजी.

  • ऑटो, बँक, हेल्थकेअर, मेटल, पॉवर घसरले.

  • टायटनचा शेअर्स ३.५ टक्क्यांनी घसरून बंद

क्षेत्रीय आघाडीवर कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, ऑईल आणि गॅस ०.६-१.५ टक्क्यांनी वाढले. तर ऑटो, बँक, हेल्थकेअर, मेटल, पॉवर, टेलिकॉम ०.४-०.८ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला.

Stock Market Sensex Nifty
वेध शेअर बाजाराचा : निफ्टी 24000, सेन्सेक्स 80,000 च्या पार

टायटनचा शेअर्स टॉप लूजर

सेन्सेक्स आज ७९,९१५ वर खुला झाला होता. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ८० हजारांपर्यंत वाढला. पण त्यानंतर तो ७९,९०० च्या पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सवर टायटनचा शेअर्स टॉप लूजर ठरला. आज हा शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरून ३,१५० रुपयांपर्यंत खाली आला. त्याचबरोबर जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, एशियन पेंट्स हे शेअर्स प्रत्येकी १ टक्क्याने घसरले. तर आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, इन्फोसिस, रिलायन्स हे शेअर्स तेजीत राहिले. (One 97 Communications Share Price)

Stock Market Closing Bell BSE Sensex
सेन्सेक्सवरील शेअर्स.BSE

निफ्टीवर डिव्हिस लॅब, टायटन, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर ओएनजीसी, एचडीएफसी लाईफ, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले.

NSE Nifty 50
निफ्टी ५० चा ट्रेडिंग आलेख.NSE

Paytm शेअर्स तेजीत, कारण काय?

पेटीएमची पेरेंट कंपनी (Paytm) One 97 Communications च्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी वाढ झाली. हा शेअर्स एनएसईवर आज ९ टक्क्यांनी वाढून ४७९ रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला. त्यानंतर त्याने ४७० रुपयांच्या पातळीवर व्यवहार केला. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी कंपनीला जागतिक स्तरावर मान्यता मिळावी आणि १०० अब्ज डॉलर्स मुल्यांकन गाठण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पेटीएम कंपनीचा शेअर्स वाढला आहे.

Stock Market Sensex Nifty
दक्षता : म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी...

Titanचा शेअर्स घसरला

टायटन कंपनीचे शेअर्स सोमवारी बीएसईवर ४ टक्क्यांनी घसरून ३,१२८ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर ही घसरण कमी झाली आणि तो दुपारच्या व्यवहारात ३ टक्के घसरणीसह ३,१६० रुपयांवर राहिला. अपेक्षेपेक्षा कमी व्यवसाय वृद्धीमुळे जागतिक ब्रोकरेज फर्मनी या शेअर्सची टार्गेट प्राइस कमी केली आहे. या पार्श्वभूमीवर या शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. (Titan shares fall)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news