वेध शेअर बाजाराचा : निफ्टी 24000, सेन्सेक्स 80,000 च्या पार

वेध शेअर बाजाराचा : निफ्टी 24000, सेन्सेक्स 80,000 च्या पार
वेध शेअर बाजाराचा : निफ्टी 24000, सेन्सेक्स 80,000 च्या पार
वेध शेअर बाजाराचा : निफ्टी 24000, सेन्सेक्स 80,000 च्या पार Pudhari File Photo
भरत साळोखे (संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.)

अजूनही निवडणुकोत्तर तेजीच सुरू आहे का, अशी शंका आहे; परंतु कोचिन शिपयार्ड, एनबीसीसी, इरकॉन, बीईएमएल या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू आहे, ती पाहता, ही केंद्रीय अंदाजपत्रकाला सलामी देण्याचे काम सुरू आहे. या आठवड्यात सरकारी कंपन्यांचा निर्देशांक nifty cpse 5 टक्के वाढला. अजूनही RVNAL, Concor, Rec, PEC या कंपन्या धावायला सुरू करायच्या आहेत. RCF, Chambal या कंपन्याही Starting Point वर आहेत.

निफ्टी 24000 च्या आणि सेन्सेक्स 80000 च्या पल्याड जाऊन आले. सेन्सेक्सच्या आतापर्यंतच्या प्रवासातील 75000 ते 80000 हा तिसरा वेगवान टप्पा आहे, जो 57 दिवसांमध्ये पार करण्यात आला. सर्वाधिक वेगवान टप्पा हा 55000 ते 60000 दरम्यानचा होता, जो केवळ 28 दिवसांत पार करण्यात आला, तर 45000 ते 50000 हा टप्पासुद्धा फक्त 33 दिवसांत पार केला गेला. तर याउलट सेन्सेक्सचा प्रारंभ झाला तो पहिला 5000 चा टप्पा गाठण्यात सेन्सेक्सला तब्बल 4357 दिवस लागले.

MSCI इंडेक्सच्या ऑगस्ट 2024 मध्ये होणार्‍या Rebalancing मध्ये एचडीएफसी बँकेचे वेटेज वाढण्याची बातमी आली आणि बँकेचा शेअर बुधवारी 1794 या 52 Week High च्या उच्चांकावर पोहोचला; परंतु शुक्रवारी बँकेची प्रथम तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर झाली आणि हा शेअर शुक्रवारी 1650 पर्यंत घसरला. ठेवी आणि कर्जामध्ये qoq धर्तीवर घसरण हे त्याचे कारण. निफ्टी, सेन्सेक्स आणि निफ्टी बँक, या प्रमुख निर्देशांकामध्ये सर्वाधिक वेटेज असणारी आणि मार्केट कॅपनुसार भारतातील तिसरी मोठी कंपनी असणारी ही बँक परदेशी आणि देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या अवघड जागेचे दुखणे होऊन बसली आहे.

कारण बँकेच्या शेअर्समध्ये FIIS चे प्रमाण 47 टक्के, तर DLLS चे प्रमाण 35 टक्के आहे आणि बँकेच्या शेअरने मागील एका वर्षात उणे 1.53 टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी या बँकेची खासगी क्षेत्रातील स्पर्धक आयसीआयसीआय बँकेने 28 टक्के, तर सरकारी बँक SBI ने 45 टक्के परतावा दिला आहे.

रेल्वे इन्फ्रा शेअर RVNL (Rail Vikas Nigam ltd) ने रु.498.50 हा आपला All time high चा उच्चांक नोंदवला. रु. 1 लाख कोटींचा Market cap चा टप्पाही कंपनीने पार पाडला. अर्थसंकल्पात रेल्वे सुधारणांवर शासनाने भर दिला, तर RVNL बरोबर Railtel, LRFC, Titagarh, IRCON हे शेअर्सही चांगले चमकतील.

रेमंडचा शेअर साडेतीन हजारांच्या जवळ जाऊन आला आहे. (शुक्रवारचा भाव रु. 3233.05) मागील एक महिन्यात हा शेअर 46 टक्के वाढला आहे. रेमंडचे डिमर्जर होऊन Raymond Lifesty आणि Raymond Realty अशा दोन कंपन्या अस्तित्वात येतील. रेमंड्या भागधारकांना Raymond Realty चे शेअर्स मिळतील.

बरेच दिवस अडखळलेला मान्सूनचा प्रवास आता सर्वदूर सुरू झाला आहे. परिणामी, फर्टिलायझर शेअर्समध्ये हालचाल दिसू लागली आहे. त्यात आणखी अर्थसंकल्पात खत कंपन्यांना सकारात्मक अशी काही बातमी आली की, या क्षेत्रातही तेजीचा संभव आहे.

टाटा मोटर्सच्या नफ्यात सन 2024 - 24 मध्ये 1200 टक्के अशी नेत्रदीपक वाढ झाली. सन 2022-23 मध्ये रु. 2351 कोटी असणारा निव्वळ नफा रु. 32203 कोटी इतका प्रचंड झाला. त्यामुळे केवळ टाटा मोटर्सच्याच नव्हे, तर शेअर बाजारात नोंदणीकृत असणार्‍या टाटा ग्रुपच्या सर्व एकत्रित कंपन्यांची बॅलन्स शीटही 18 वर्षांनतर प्रथमच सुधारली.

या महिन्याच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होईल. नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे भांडवली खर्चात मोकळा हात सोडला जाईल. पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट वाढवले जाईल. परिणामी इन्फ्रा, रिअ‍ॅल्टी आणि सिमेंट कंपन्यांना बहार येईल. गेली काही वर्षे डिफेन्स सेक्टर आणि Ship Building सेक्टर ही दोन सेक्टर्स सरकारची आवडती बनली आहेत. रेल्वे शेअर्सही सुसाट धावतील आणि मग 25000 हा अभूतपूर्व टप्पा निफ्टी हसत खेळत पार करेल. हे वास्तवात उतरेल की स्वप्नरंजन होईल, हे जुलैच्या शेवटच्या एक्स्पायरीला कळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news