Mutual Fund Rules: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबी डीमॅटचे नियम बदलणार; कोणाला होणार फायदा?

Mutual Fund Rules: सेबी डीमॅट अकाउंटमधील म्युच्युअल फंड व्यवहार सोपे करण्यासाठी नवी ऑटोमेटेड सिस्टम आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे SWP आणि STPची प्रक्रिया ऑटोमेटेड होणार आहे.
Sebi Demat Mutual Fund Rules
Sebi Demat Mutual Fund RulesPudhari
Published on
Updated on

Sebi Demat Mutual Fund Rules: डीमॅट अकाउंटद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सेबी पैसे काढण्याची आणि फंड ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी नव्या प्रणालीवर काम करत आहे.

5 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केलेल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये सेबीने ऑटोमेटेड स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे डीमॅट आणि SOA (स्टेटमेंट ऑफ अकाउंट) या दोन्ही पद्धतींमधील फरक कमी होणार आहे.

सध्या डीमॅट होल्डर्सना प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी किंवा एका फंडातून दुसऱ्या फंडात रक्कम हलवण्यासाठी मॅन्युअल रिक्वेस्ट करावी लागते. पण नवी व्यवस्था लागू झाली, तर सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP) आणि सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP) आपोआप सुरू राहतील यासाठी कोणतीही मॅन्युअल रिक्वेस्ट द्यावी लागणार नाही.

Sebi Demat Mutual Fund Rules
Raigad Ratnagiri Sindhudurg ZP Result 2026 LIVE: कोकणात महायुतीचे वर्चस्व; कोणत्या पक्षाला किती जागा! पाहा संपूर्ण निकाल

कोणाला होणार सर्वाधिक फायदा?

ही सुविधा सुरु झाली तर सर्वाधिक फायदा नियमित उत्पन्नासाठी म्युच्युअल फंडावर अवलंबून असलेल्या गुंतवणूकदारांना होईल. विशेषतः निवृत्त नागरिक, SWP वापरणारे गुंतवणूकदार आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळेल.

दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीनंतर पैसे काढण्यासाठी वारंवार फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. ठरलेल्या वेळेत रक्कम थेट खात्यात जमा होईल. त्यामुळे वेळ वाचेल आणि गुंतवणूक करणे अधिक सोपं होईल.

Sebi Demat Mutual Fund Rules
Pune ZP Election Result Live: पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता; किती जागा जिंकल्या?

पॉवर ऑफ अटॉर्नीशिवायही सुविधा

आतापर्यंत अनेक गुंतवणूकदार सोयीसाठी ब्रोकरला पॉवर ऑफ अटॉर्नी देतात, ज्यामुळे त्यांचं गुंतवणुकीवरील थेट नियंत्रण कमी होतं. सेबीचा प्रयत्न आहे की स्टँडिंग इन्स्ट्रक्शन थेट डिपॉझिटरी सिस्टिममध्ये दिली जावीत, जेणेकरून गुंतवणूकदाराचं नियंत्रण कायम राहील.

सेबीच्या मते, या बदलामुळे गुंतवणूकदारांना आपल्या पैशांवर अधिक अधिकार मिळेल आणि प्रक्रिया पारदर्शक होईल. मात्र ही नवी व्यवस्था नेमकी कधी लागू होणार, याबाबत अजून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news