Stock Market Today: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला, बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Today: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारासाठी अत्यंत सकारात्मक झाली. भारत-अमेरिका दरम्यान ट्रेड डील झाल्याच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारांवर दिसून आला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारासाठी अत्यंत सकारात्मक झाली. भारत-अमेरिका दरम्यान ट्रेड डील झाल्याच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारांवर दिसून आला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 400 अंकांनी, तर निफ्टी जवळपास 140 अंकांनी वाढीसह व्यवहार करत होता. PSU बँक निर्देशांकात सुमारे 3 टक्क्यांची तेजी दिसून आली, तर मेटल आणि आयटी शेअर्सही चांगल्या स्थितीत होते.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत 597 अंकांच्या वाढीसह 84,177 वर उघडला. निफ्टीने 195 अंकांची वाढ नोंदवत 25,888 ची पातळी गाठली. बँक निफ्टी 685 अंकांनी वधारत 60,805 वर उघडला. रुपयाही डॉलरच्या तुलनेत 8 पैशांनी मजबूत होत 90.58 प्रति डॉलरवर स्थिरावला.

निफ्टी 50 मधील SBI, Titan, Adani Enterprises, Tata Steel, Eternal, Dr Reddy’s आणि Hindalco या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसली. तर Eicher Motors, Max Healthcare, Bajaj Finance, HUL, Nestle, Infosys आणि ONGC या शेअर्समध्ये घसरण झाली.

भारत-अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक ट्रेड डील फ्रेमवर्कमुळे जागतिक तसेच देशांतर्गत बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या डीलनंतर अमेरिकन बाजारांत जोरदार तेजी पाहायला मिळाली असून त्याचे प्रतिबिंब GIFT Nifty मध्येही दिसून आले. आजच्या व्यवहारांची दिशा कमोडिटी, FII फ्लो आणि कंपन्यांचे निकाल ठरवणार आहेत.

Stock Market Today
Satara Sangli Solapur ZP Result 2026: सोलापुरात भाजप, साताऱ्यात अजित पवार गटाची सरशी; सांगली कोणाकडे? पाहा संपूर्ण निकाल

ट्रेड डीलमुळे मोठा दिलासा

‘King of All Deals’ अंतर्गत भारतीय उत्पादनांवरील रेसिप्रोकल टॅरिफ 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. अनेक उत्पादनांवर निर्यात शुल्क शून्यावर आले आहे. या करारामुळे भारताला अमेरिकेच्या सुमारे 30 ट्रिलियन डॉलरच्या बाजारात मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळणार आहे. पुढील पाच वर्षांत भारत अमेरिकेकडून सुमारे 500 अब्ज डॉलरची आयात करणार आहे. याशिवाय, रशियाकडून तेल खरेदीवर लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफही हटवण्यात आल्याने ऊर्जा बाजाराला दिलासा मिळाला आहे.

Stock Market Today
Raigad Ratnagiri Sindhudurg ZP Result 2026 LIVE: कोकणात महायुतीचे वर्चस्व; कोणत्या पक्षाला किती जागा! पाहा संपूर्ण निकाल

अमेरिकन बाजारांत ऐतिहासिक तेजी

टेक शेअर्सच्या जोरावर अमेरिकन बाजारांत तुफानी तेजी दिसून आली. डाओ जोन्स 1200 अंकांनी वाढत पहिल्यांदाच 50,000 च्या वर बंद झाला. सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर नॅस्डॅकही सुमारे 500 अंकांनी वाढला. या मजबूत जागतिक संकेतांमुळे GIFT Nifty सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 25,950 च्या आसपास व्यवहार करताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news