Railway stocks | गुंतवणूकदार सुखावले! 'या' रेल्वे शेअर्सनी पकडला बुलेट ट्रेनचा वेग, १५ टक्क्यांपर्यंत वाढ

रेल्वे शेअर्स वाढीचे कारण काय?
BSE Sensex
केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे कंपन्यांचे शेअर्स सोमवारी (दि.८) १५ टक्क्यांपर्यंत वाढले. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी (Union Budget) रेल्वे कंपन्यांचे शेअर्स (Railway stocks) सोमवारी (दि.८) १५ टक्क्यांपर्यंत वाढले. यात आरव्हीएनएल (RVNL), इरकॉन इंटरनॅशनल, आयआरएफसी (IRFC) या शेअर्सचा समावेश आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या शुक्रवारी सुमारे २,५०० नवीन जनरल पॅसेंजर ट्रेन डबे आणि अतिरिक्त १० हजार डब्यांच्या निर्मितीला मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. वैष्णव यांच्या ५० नवीन अमृत भारत ट्रेन्सच्या निर्मितीच्या घोषणेनंतर रेल्वे कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.

BSE Sensex
Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, Paytm शेअर्स तेजीत, कारण काय?

कोणते शेअर्स वाढले?

रेल्वे विकास निगमचा शेअर्स (Rail Vikas Nigam Share Price Indian) आज एनएसईवर १५ टक्क्यांनी वाढून ५६५ रुपयांवर गेला. भारतीय रेल्वे फायनान्स कार्पोरेशनचा (IRFC) शेअर्स ७ टक्क्यांनी वाढला. इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर्स आज एनएसईवर ६ टक्क्यांनी वाढून ३३४ रुपयांपर्यंत वाढला. दरम्यान, आज इतर रेल्वे कंपन्यांचे शेअर्सनेही वाढले. टेक्समॅको रेल्वे अँड इंजिनिअरींगचा शेअर्स ८ टक्क्यांनी तर रेलटेलचा शेअर ७ टक्क्यांनी वाढून ५५९ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले.

गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा

गेल्या एका वर्षात रेल्वे शेअर्सनी त्यांच्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा झाला आहे. आता केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे शेअर्स आणखी तेजीत आले आहेत.

BSE Sensex
एसआयपीत सतत बदल नुकसानकारक

रेल्वे सुविधांवर विशेष लक्ष

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या अपेक्षेमुळे रेल्वे कंपन्यांचे शेअर्स वाढण्यास मदत झाली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. केंद्र सरकार रेल्वे पायाभूत सुविधांत सुधारणा करणे आणि जलद विकास तसेच ट्रॅक, रेल्वे विद्युतीकरण, रोलिंग स्टॉक निर्मिती आणि प्रवासी मालवाहतूक सेवांचे वितरण सुनिश्चित करण्यावर अधिक भर देत आहे. केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद २०२३-२४ च्या २.४० लाख कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये २.५५ लाख कोटी रुपये केली होती.

BSE Sensex
आयकर : पहिल्यांदा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना...

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news