Rahul Gandhi Stock: राहुल गांधींच्या ‘फेव्हरेट’ शेअरने केले मालामाल; काही तासांत केली 17 हजार कोटींची कमाई

Rahul Gandhi ICICI Bank Share News: राहुल गांधींच्या आवडीच्या शेअर्सपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली. काही तासांतच बँकेच्या बाजारमूल्यात तब्बल 17 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Pudhari
Published on
Updated on

Rahul Gandhi’s Favourite Stock ICICI Bank Jumps: शेअर बाजारात सध्या चढ-उतार सुरू असले तरी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘फेव्हरेट’ शेअर मालामाल करतोय. राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओतील एक महत्त्वाचा शेअर म्हणजे आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) बाजारमूल्यात काही तासांत तब्बल 17 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये मोठी वाढ

आज शुक्रवारी सकाळपासूनच आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसत होती. दुपारी 2.55 वाजेपर्यंत हा शेअर 1.76 टक्क्यांनी वाढून 1,343.65 रुपये या दराने व्यवहार करत होता. काही वेळातच तो दिवसाच्या उच्चांकावर म्हणजे 1,344.20  रुपयांपर्यंत पोहोचला. आज हा शेअर 1,318.55 रुपयांवर उघडला होता, तर मागील दिवशी तो 1,320.40 रुपयांवर बंद झाला होता.

31 जुलै रोजी बँकेचा शेअर 1,494.10 रुपये या पातळीवर गेला होता, जो गेल्या 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. म्हणजेच गेल्या शंभर दिवसांत शेअर किंचित खाली आला असला, तरी त्यात जोरदार वाढ झाली आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi On Parth Pawar: 'मत चोरी'तून बनलेल्या सरकारची 'जमीन चोरी', राहुल गांधींनी पार्थ पवारांवरून थेट मोदींना घेरलं

काही तासांत 17 हजार कोटींची वाढ

या वाढीमुळे बँकेच्या बाजारमूल्यात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी बँकेचे एकूण बाजारमूल्य 9,43,568.59 कोटी रुपये होते, जे शुक्रवारी वाढून 9,60,576.26 कोटी रुपये झाले. म्हणजेच केवळ एका दिवसात 17,007.67 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, जी अनेक मिडकॅप कंपन्यांच्या एकूण मूल्याएवढी आहे.

राहुल गांधींची गुंतवणूक आणि वाढलेली किंमत

राहुल गांधी यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आयसीआयसीआय बँकेतील त्यांच्या शेअर्सचा उल्लेख केला होता. त्यांच्या नावावर 2,299 शेअर्स आहेत. त्या वेळी म्हणजे 3 मे 2024 रोजी या शेअरची किंमत 1,142 रुपये होती. म्हणजेच त्या वेळी त्यांच्या या शेअर्सचे एकूण मूल्य 26,25,458 लाख रुपये इतके होते.

Rahul Gandhi
Rahul Gandhi: 'फक्त एक काम पूर्ण झालं की लग्न करणार!' राहुल गांधींनी सांगितला त्यांच्या लग्नाचा 'तो' सीक्रेट प्लॅन

सध्याच्या दरानुसार या शेअर्सची किंमत 30.90 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच फक्त दीड वर्षात राहुल गांधींना सुमारे 4.65 लाख रुपयांचा नफा झाला आहे. आयसीआयसीआय बँक ही देशातील अग्रगण्य खाजगी बँक असून, तिच्या शेअर्सवर नेहमीच गुंतवणूकदारांचा विश्वास राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news