Post Office Scheme: कोणतीही जोखीम नाही... महिन्याला कमवा १०,००० रूपये; पोस्टाची ही फायदेशीर स्कीम

Post Office Scheme
Post Office Schemepudhari
Published on
Updated on

Post Office Scheme: म्युचअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं वाटतंय... मात्र बँक एफडीतून मिळणारा परतावा फारच कमी वाटतोय... तर तुमच्यासाठी पोस्ट घेऊन आलंय एक भन्नाट स्कीम. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ज्यांना गुंतवणुकीत जास्त जोखीम घ्यायची नाहीये अशांसाठी अत्यंत फलदायी सेव्हिंग स्कीम आहे. या स्कीममधून तुम्हाला प्रत्येक महिन्याला इनकम मिळणार आहे.

Post Office Scheme
अर्थवार्ता : म्युच्युअल फंडात पैशांचा पाऊस! मार्चमध्ये ४०,४५० कोटींची गुंतवणूक

सरकारकडून सपोर्ट केली जाणारी ही छोटी सेव्हिंग योजना विशेषकरून निवृत्त लोकांसाठी आणि मार्केटच्या चढ उताराशिवाय गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी आहे. या स्कीममधील जॉईंट पोस्ट ऑफिस mis अकाऊंटमध्ये १५ लाख रूपये गुंतवू शकतात. आता १५ लाख गुंतवल्यानंतर महिन्याला किती रक्कम मिळणार हे जाणून घेऊयात.

Post Office Scheme
Investment Strategy: दरमहा 5,000 रुपये गुंतवले तर 1 कोटी होण्यासाठी किती वेळ लागेल? जाणून घ्या स्मार्ट गुंतवणुकीचं गणित

किती आहे लिमिट?

पोस्ट ऑफिसच्या सरकारी योजनेअंतर्गत एक व्यक्ती एका अकाऊंटमध्ये जास्तीजास्त ९ लाख रूपये आणि जॉईंट अकाऊंटमध्ये जास्तीजास्त १५ लाख रूपये गुंतवू शकतो. या योजनेअंतर्गत सध्याच्या घडीला प्रत्येक वर्षी ७.४ टक्के व्याजदर मिळतो. याचे पेमेंट प्रत्येक महिन्याला करता येऊ शकते. पोस्टाच्या सर्व MIS अकाऊंटमध्ये एका व्यक्तीची एकूण रक्कम ९ लाख तर जॉईंट अकाऊंटमध्ये १५ लाखापेक्षा जास्त रक्कम असू नये.

Post Office Scheme
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना... घरबसल्या दरमहा 20,500 रुपये कमवा, तुमची रिटायरमेंट एन्जॉय करा

प्रत्येक महिन्याला किती मिळणार?

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मंथली सेव्हिंग स्कीममध्ये एकाचवेळी १५ लाख रूपये गुंतवता त्यावेळी तुम्हाला सध्याच्या ७.४ टक्के व्याजदराने महिन्याला १० हजार रूपये मिळू शकतात.

  • गुंतवणुकीची रक्कम - १५ लाख रूये

  • प्रत्येक महिन्याचा इनकम - ९,२४९ रूपये

  • व्याज दराने वर्षाची कमाई - १ लाख ११ हजार रूपये.

या गणितानुसार एक गुंतवणूकदार ५ वर्षात प्रत्येक महिन्याला ९ हजार २५० रूपये मिळवू शकतो. या पाच वर्षात त्याची कमाई ही ५,५५,००० रूपये होणार आहे.

Post Office Scheme
Pune PMFME Scheme Projects: पीएमएफएमई योजनेतून पुणे जिल्ह्यात २५० प्रकल्प कार्यान्वित; ४६ कोटींची गुंतवणूक

आधीच स्कीम बंद केली तर

पोस्ट ऑफिस mis खाते उघडल्यानंतर एका वर्षाच्या आत खाते बंद करण्यास मनाई आहे. जर हे अकाऊंट ३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी बंद केलं तर डिपॉझिट रक्कमेच्या २ टक्के फी कट केली जाते. उर्वरित रक्कम तुम्हाला परत मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news