

Post Office NSC Scheme: पोस्ट ऑफिसच्या सरकारी बचत योजना आता रिटर्नच्या बाबतीत चांगल्या प्रसिद्ध होत आहेत. विशेष म्हणजे गुंतवणूकदारांसाठी हा गुंतवणुकीचा एक सेफ पर्याय ठरत आहे. पोस्टाच्या गुंतवणुकीत रिटर्नची हमी आणि सुरक्षा खुद्द सरकार देते.
पोस्टाच्या स्कीम या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. पोस्टाच्या स्कीमद्वारे छोट्या गुंतवणुकीद्वारे देखील मोठा फंड जमा करता येतो. सरकार छोट्या सेव्हिंग स्कीमवर चांगल्या व्याजाची ऑफर मिळत आहे. त्याचबरोबर या गुंतवणुकीला सुरक्षेची हमी देखी मिळते.
जर तुम्हाला देखील कोणताही धोका न पत्करता गुंतवणूक करायची आहे. या योजनेद्वारे जास्त फायदा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिटेक अर्थात Post Office NSC Scheme ही फायदा देणारी स्कीम ठरू शकते. या स्कीममधील गुंतवणुकीद्वारे फक्त व्याजच जवळपास ४ लाख ५० हजार रूपये मिळू शकते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट पोस्ट ऑफिसचा प्रसिद्ध स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत चालवली जाणारी ही योजना आहे. या योजाना मध्यम वर्ग आणि निवृत्तीचं प्लॅनिंग करणाऱ्यांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. यात ५ वर्षे किमान १००० रूपयांपासून गुंतवणूक करू शकता. जास्तीजास्त तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता. जेवढी जास्त गुंतवणूक तेवढा जास्त फायदा
पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग स्कीम आज जास्त प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे यात धोका अत्यंत नगण्य असतो आणि व्याज दर इतर बँकांपेक्षा जास्त असतो. पोस्ट ऑफिस स्कीममधील छोट्या मोठ्या गुंतवणुकीवर सरकार गॅरेंटी देते. यात लावलेला पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग स्कीमवर सरकार ७.७ टक्के व्याजाची ऑफर देते.
पोस्ट ऑफिस एनएससी योजनेचा लाभ फक्त भारतीय निवासी घेऊ शकतात. एनआरआय, कंपनी किंवा ट्रस्ट अथवा एचयुएफ याचा लाभ घेऊ शकत नाहीत. यात २ किंवा ३ लोक मिळून जॉईंट अकाऊंट काढू शकात.
या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना टॅक्स सूट देखील मिळते. इनकम टॅक्स अॅक्ट ८० सी अंतर्गंत तुम्हाला या गुंतवणुकीत वर्षाला १.५ लाखांपर्यंत टॅक्स सूट मिळू शकते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अंतर्गत ७.७ टक्के वर्षाला व्याज मिळते. या हिशाबाने जर एखादा नागरिक १० लाख रूपये एकरकमी गुंतवतो तर ५ वर्षात त्याला ४ लाख ४९ हजार ०३४ रूपये फक्त व्याज मिळेल. याचा अर्थ पाच वर्षानंतर एकूण रक्कम ही १४ लाख ४९ हजार ०३४ रूपये होणार आणि पूर्ण रक्कम टॅक्स फ्री असणार आहे.
पहिल्या वर्षी ७७००० हजार रूपये दुसऱ्या वर्षी १ लाख ५९९२९ रूपये, तिसऱ्या वर्षी २ लाख ४९ हजार ४४ रूपये चौथ्या वर्षात ३ लाख ४५ हजार रूपये पाचव्या वर्षात ४ लाख ४९ लाख ०३५ रूपये फक्त व्याज मिळणार आहे.