PM Kisan Update: PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार? शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्याबाबत महत्त्वाची अपडेट

PM Kisan 23rd Installment: PM किसान योजनेचा 23वा हप्ता जून किंवा जुलै 2026 दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
PM Kisan 23rd Installment
PM Kisan 23rd InstallmentPudhari
Published on
Updated on

PM Kisan 23rd Installment: पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची वाट पाहत असाल, तर 23व्या हप्त्याबाबतची ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

याआधी 13 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गुवाहाटी येथून PM किसान योजनेचा 22वा हप्ता जारी केला होता. त्यावेळी देशातील 9.3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात आले होते. आता शेतकऱ्यांचे लक्ष 23व्या हप्त्याकडे लागले आहे.

23वा हप्ता कधी येणार?

PM किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

योजनेच्या वेळापत्रकानुसार:

  • पहिला हप्ता: एप्रिल ते जुलै

  • दुसरा हप्ता: ऑगस्ट ते नोव्हेंबर

  • तिसरा हप्ता: डिसेंबर ते मार्च

22वा हप्ता मार्च 2026 मध्ये जमा झाल्याने आता 23वा हप्ता एप्रिल-जुलै सायकलमध्ये म्हणजेच जून किंवा जुलै 2026 दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकार किंवा कृषी मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

PM Kisan 23rd Installment
Fuel Price Hike Impact: फक्त पेट्रोल आणि डिझेलच नाही... तर आता 'या' वस्तूंच्या किमतीही वाढणार; तज्ज्ञांनी दिला इशारा

या 3 चुका केल्यास 2000 रुपये अडकू शकतात

अनेकदा हप्ता जाहीर होऊनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. यामागे काही तांत्रिक आणि कागदपत्रांशी संबंधित कारणं असतात.

1. e-KYC पूर्ण करा

तुमचं e-KYC अपडेट नसल्यास हप्ता अडकू शकतो. हे काम तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर किंवा ऑनलाइन OTP च्या मदतीने करू शकता.

2. आधार-बँक लिंक तपासा

सरकार DBT द्वारे थेट आधार लिंक खात्यात पैसे पाठवते. त्यामुळे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर व्यवहार अयशस्वी होऊ शकतो.

3. जमिनीचे व्हेरिफिकेशन आवश्यक

शासकीय नोंदींमध्ये तुमच्या जमिनीचे पडताळणी (Land Verification) पूर्ण असणे गरजेचे आहे.

सरकारची अपात्र लाभार्थ्यांवर नजर

सरकारने या योजनेत पारदर्शकता वाढवली असून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. नियमांनुसार, 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेती जमीन खरेदी केलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच, एका कुटुंबातील पती-पत्नी दोघेही स्वतंत्रपणे योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांची चौकशी होऊन हप्ता बंद होऊ शकतो.

PM Kisan 23rd Installment
Ruturaj Gaikwad: CSKमध्ये अंतर्गत नाराजी? हेड कोच फ्लेमिंग ऋतुराजवर भडकले; वक्तव्याने उडाली खळबळ

घरबसल्या स्टेटस कसं तपासाल?

तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही, हे तुम्ही मोबाईलवरून सहज तपासू शकता. यासाठी PM किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा. ‘Farmers Corner’ मध्ये ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा भरून ‘Get Status’ वर क्लिक करा. काही सेकंदांत तुमच्या हप्त्यांची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news