

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने आज घसरणीसह सुरुवात केली आहे. ओपनिंगनंतर सेन्सेक्स जवळपास 70 अंकांनी खाली आला, तर निफ्टी 50 अंकांनी घसरला. बहुतांश सेक्टोरल इंडेक्स लाल रंगात होते. फक्त मीडिया आणि ऑइल-गॅस सेक्टरमध्येच थोडीशी तेजी दिसत होती.
आज सर्वात मोठा धक्का इंडिगोला बसला कारण कंपनीचा शेअर तब्बल 5–6% ने कोसळला. निफ्टी 50 वर इंडिगो, ईटर्नल, BEL, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, ट्रेंट आणि सन फार्मा हे शेअर्स घसरले. तर अॅक्सिस बँक, टाटा कन्झ्युमर, रिलायन्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, HUL, JSW स्टील आणि TCS हे शेअर्स वाढले.
शुक्रवारी अमेरिकन बाजारात डाओ 100 अंकांनी आणि नॅस्डॅक 75 अंकांनी वाढीसह बंद झाला. तरीही GIFT निफ्टी 26325 च्या आसपास सपाट आहे, ज्यामुळे भारतीय बाजाराला सपोर्ट मिळाला नाही.
अमेरिकेचे प्रतिनिधिमंडळ आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येणार असून ट्रेड डील फायनल करण्यावर भर दिला जाणार आहे. ही बैठक बाजारासाठी महत्त्वाची ठरु शकते.
देशांतर्गत बाजारात चांदीने ₹5,300 ने वाढ घेत 1,85,234 रुपये किलोचा नवा उच्चांक गाठला. सोनेही 400 रुपयांनी वाढून ₹1,30,500 वर स्थिरावले. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 60 डॉलरच्या जवळ पोहोचली आहे, तर कच्च्या तेलाने 64 डॉलरचा टप्पा गाठला आहे.
शुक्रवारी FIIs ने सलग सातव्या दिवशी विक्री केली असून यावेळी त्यांनी 439 कोटींची निव्वळ विक्री केली. मात्र इतर सेगमेंटमध्ये त्यांची एकूण खरेदी जवळपास 1,200 कोटींच्या आसपास होती. देशांतर्गत फंडांनी सलग 70व्या दिवशी खरेदी करत 4,200 कोटी रुपये गुंतवले.
DGCA ने विमान भाड्यावर ₹18,000 ची मर्यादा घातली आहे. त्यामुळे एअर इंडियाने जादा घेतलेले भाडे ग्राहकांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगोला आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फ्लाइट कॅन्सिलेशनवर आलेल्या नोटिसला उत्तर द्यावे लागणार आहे.
Biocon आपल्या Biocon Biologics मधील उर्वरित हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
Eternal मध्ये आज 1,500 कोटींची ब्लॉक डीलची शक्यता.
5.20 कोटी शेअर्स ₹289.50 या फ्लोर प्राइसवर विकले जाऊ शकतात.
Wakefit IPO: प्राइस बँड ₹185–₹195
Corona Remedies IPO: प्राइस बँड ₹1008–₹1062
RBI ने Fino Payments Bank ला स्मॉल फायनान्स बँक बनण्यास मंजुरी दिली आहे.