Nifty चा नवा विक्रमी उच्चांक! IT स्टॉक्स तेजीत, कारण काय?

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज

पुढारी ऑनलाईन डेस्क : एनएसई निफ्टीने (NSE Nifty 50) आज शुक्रवारी (दि.२१) नवीन विक्रमी उच्चांक गाठला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीने २३,६६७ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर निफ्टी २३,६०० च्या सपाट पातळीवर आला. तर सेन्सेक्स (Sensex) ७७,५०० जवळ व्यवहार करत आहे.

आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारले, कारण काय?

IT शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून येत आहे. निफ्टी आयटी सुमारे २ टक्क्यांनी वाढला आहे. निफ्टी आयटीवर Persistent, LTIMindtree आणि L&T Technology हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. आयटी सेवा कंपनी Accenture ने त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वार्षिक महसूल वाढीचा अंदाज अपेक्षेपेक्षा अधिक वर्तवला आहे. यामुळे अमेरिकेच्या बाजारातील ट्रेडिंगमध्ये Accenture चे शेअर्स सुमारे ७ टक्क्यांनी वाढले. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.

निफ्टीवर काय स्थिती?

निफ्टी ५० वर LTIM, भारतीय एअरटेल, इन्फोसिस, टीसीएस, हिंदाल्को हे शेअर्स वाढून व्यवहार करत आहेत. तर एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, अदानी एंटरप्रायजेस हे शेअर्स घसरले आहेत.

सेन्सेक्सवर कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर इन्फोसिस, भारती एअरटेल, टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एनटीपीसी, विप्रो, पॉवर ग्रिड हे शेअर्समध्ये १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर टाटा स्टील, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

१३ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी केवळ आयटी, हेल्थकेअर आणि फार्मा हे निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. एफएमसीजी निर्देशांकाला सर्वाधिक फटका बसला आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news