LPG Shortage: LPG टंचाईचा फटका फूड डिलिव्हरी क्षेत्राला; Swiggy-Zomato ऑर्डरमध्ये मोठी घट, गिग वर्कर्सची कमाई थांबली

LPG Shortage India: एलपीजी टंचाईमुळे देशातील अनेक रेस्टॉरंट आणि क्लाउड किचनचे काम थांबले आहे. यामुळे Zomato आणि Swiggy सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर ऑर्डरमध्ये मोठी घट झाली आहे.
LPG Shortage Impact Zomato Swiggy
LPG Shortage Impact Zomato Swiggy Pudhari
Published on
Updated on

LPG Shortage Impact Zomato Swiggy Orders India: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता भारतातील अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा परिणाम देशातील एलपीजी पुरवठ्यावर होत आहे.

याचा थेट फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला बसत असून, त्याचबरोबर फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato आणि Swiggy वरही ऑर्डरमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी हजारो गिग वर्कर्सच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे.

अनेक शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे रेस्टॉरंट, क्लाउड किचन आणि ढाबे यांचे काम थांबले आहे. काही ठिकाणी हॉटेल्सना मर्यादित क्षमतेने काम करावे लागत आहे, तर काही ठिकाणी व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याचा थेट परिणाम ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांवर होत असून, ग्राहकांकडून येणाऱ्या ऑर्डरमध्ये मोठी घट झाली आहे.

उद्योग क्षेत्रातील अहवालांनुसार, पूर्वी एका डिलिव्हरी पार्टनरला दिवसाला साधारण २५ ते ३० ऑर्डर मिळत असत. मात्र सध्या अनेक डिलिव्हरी वर्कर्सना केवळ ५ ते १० ऑर्डर मिळत असल्याचे समोर येत आहे. गिग अँड प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियननेही याबाबत चिंता व्यक्त केली असून, या परिस्थितीमुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उत्पन्नात अचानक घट झाल्यामुळे अनेक कामगारांना कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण झाले आहे.

याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. Zomato ची पॅरेंट कंपनी Eternal Ltd. च्या शेअर्समध्ये जवळपास ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली, तर Swiggy च्या शेअर्सनी नीचांकी पातळी गाठली आहे. फूड सेक्टरवरील दबाव वाढल्यामुळे Domino’s Pizza चालवणाऱ्या Jubilant FoodWorks सारख्या कंपन्यांच्या शेअर्सवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

LPG Shortage Impact Zomato Swiggy
Pune Marathi Bhasha Bhavan: पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवन प्रकल्प दहा वर्षांपासून रखडला

भारता एलपीजी मोठ्या प्रमाणावर आयात करत आहे. देशातील एकूण गरजेपैकी निम्म्याहून अधिक एलपीजी पश्चिम आशियातून आयात केला जातो. मात्र सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे महत्त्वाच्या समुद्री मार्गांवर अडथळे निर्माण झाले आहेत.

विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुज या जागतिक ऊर्जा वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मार्गावर तणाव निर्माण झाल्यामुळे टँकर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतीय बंदरांपर्यंत एलपीजी पुरवठा वेळेवर पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

या संकटाचा सर्वाधिक फटका हॉटेल उद्योगाला बसत असल्याचे उद्योग संघटनांचे म्हणणे आहे. मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईमधील उद्योग संघटनांनी इशारा दिला आहे की परिस्थिती सुधारली नाही तर पुढील काही दिवसांत जवळपास ५० टक्के रेस्टॉरंट बंद पडण्याची शक्यता आहे.

LPG Shortage Impact Zomato Swiggy
Sunetra Pawar : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act) लागू केला असून घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा तुलनेने कमी झाला आहे.

अलीकडेच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुमारे ७ टक्क्यांनी वाढ झाली असून त्याची किंमत ९१३ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही या महिन्यात दोन वेळा वाढ करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news