Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई, 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ११.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठी प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला.
Raja Shivaji Box Office Collection Day 1
Raja Shivaji Box Office Collection Day 1Pudhari
Published on
Updated on

Raja Shivaji Box Office Collection Day 1: अभिनेता रितेश देशमुखचा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट 'राजा शिवाजी' १ मे रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत लक्ष वेधून घेतले. रितेश देशमुखने दिग्दर्शित, सहलेखन केलेल्या आणि प्रमुख भूमिका साकारलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात तब्बल ११.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ट्रेड वेबसाइट Sacnilk च्या अहवालानुसार, चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मराठीने सुमारे ८.७५ कोटी रुपयांची कमाई केली, तर हिंदीने २.९५ कोटी रुपये कमावले. विकेंड जवळ आल्यामुळे येत्या दोन दिवसांत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Raja Shivaji Box Office Collection Day 1
Nagraj Manjule Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’मधून नागराज मंजुळे बाहेर का पडले? रितेश देशमुखने सांगितलं खरं कारण

विशेष म्हणजे, 'मणिकर्णिका' या कंगना रणौत अभिनित ऐतिहासिक चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईलाही ‘राजा शिवाजी’ने मागे टाकले आहे. ‘मणिकर्णिका’ने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी ८.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र तानाजी आणि छावा यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांच्या तुलनेत ‘राजा शिवाजी’ची कमाई अद्याप कमी असल्याचे दिसत आहे.

हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून मराठा साम्राज्याच्या स्थापनेचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून जेनेलिया डिसूझा यांनी सईबाईंची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे, रितेश आणि जिनिलियाच्या मुलाने चित्रपटात बाल शिवाजीची भूमिका साकारली आहे.

Raja Shivaji Box Office Collection Day 1
Raja Shivaji Movie|''शिवाजी नाही... शिवाजी राजं म्हणायचं...'', सलमानच्या एका डायलॉगवर प्रेक्षकांच्या शिट्याच शिट्या.. (Video)

चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान आणि जितेंद्र जोशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुमारे १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट मानला जात आहे.

चित्रपटाच्या भव्यतेचे आणि रितेश देशमुखच्या अभिनयाचे कौतुक होत असले तरी काही समीक्षकांनी चित्रपटाचा कालावधी आणि पटकथेच्या गतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तरीही पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता ‘राजा शिवाजी’ पुढील काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करू शकतो, अशी चर्चा सिनेवर्तुळात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news