CNG Price Hike: LPG आणि दुधानंतर आणखी एक झटका; आता CNGही झाला महाग, किती वाढली किंमत?

CNG Price Hike: मुंबईत CNG च्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन दर ₹८४ प्रति किलो झाला आहे.
CNG Price Hike
CNG Price HikePudhari
Published on
Updated on

CNG Price Hike: महागाईने सर्वसामान्यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. LPG गॅस सिलिंडर, दूध दरवाढीनंतर आता CNG देखील महाग झाला आहे. मुंबईत CNG च्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवीन दर आता ₹८४ प्रति किलो झाला आहे. या दरवाढीमुळे प्रवासी, ऑटो-टॅक्सी चालक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि आसपासच्या भागात CNG पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने (MGL) ही दरवाढ जाहीर केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, नवीन दर १४ मेच्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

कंपनीने या दरवाढीमागे जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता, पश्चिम आशियातील संघर्ष आणि इंधन खरेदीचा वाढलेला खर्च ही प्रमुख कारणे सांगितली आहेत. विशेषतः इराणशी संबंधित तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर रुपयाच्या घसरणीमुळे आयात खर्चही वाढल्याचा परिणाम CNG च्या दरांवर झाला आहे.

ही दरवाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा आधीच अमूल आणि मदर डेअरीने दूधाच्या दरात वाढ केली आहे. त्यापूर्वी व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किंमतीतही मोठी वाढ झाली होती. त्यामुळे महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

CNG Price Hike
Raja Shivaji BO Day 13: ‘राजा शिवाजी’ने सर्व विक्रम मोडले! 13 दिवसांत सगळा खर्च वसूल; आतापर्यंत किती कोटी कमावले?

CNG दरवाढीचा सर्वात मोठा परिणाम वाहतूक क्षेत्रावर होणार असल्याचे मानले जात आहे. मुंबई महानगर प्रदेशात (MMR) जवळपास १२.८ लाख वाहने CNG वर चालतात. यामध्ये सुमारे ४.७ लाख ऑटो रिक्षा, १.६ लाखांहून अधिक टॅक्सी आणि ५ लाखांपेक्षा जास्त खासगी कार्स यांचा समावेश आहे.

विशेषतः ऑटो रिक्षा चालकांसाठी ही दरवाढ खर्चिक ठरणार आहे. CNG महागल्यामुळे प्रति किलोमीटर ऑपरेटिंग कॉस्ट सुमारे ₹१.०३ ने वाढू शकते, असे सांगितले जात आहे. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होण्याची शक्यता असून, लवकरच ऑटो आणि टॅक्सी भाडेवाढीवर चर्चा सुरू होऊ शकते.

CNG Price Hike
EPFO Update: तुमचं काम फटाफट पूर्ण होणार... ७ कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी; EPFO मोठा बदल करण्याच्या तयारीत

याशिवाय, मुंबईतील हजारो BEST बस आणि राज्य परिवहनाच्या CNG बस सेवांवरही या वाढीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक खर्चातही बदल होऊ शकतो.

एकंदरीत, वाढत्या जागतिक तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर दिसू लागला आहे. दूध, LPG नंतर आता CNG महागल्याने येत्या काळात वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news