Lenskart Controversy: 'टिकली-टिळा' वादामुळे लेंसकार्टला मोठा फटका; 4,500 कोटींच नुकसान, शेअर बाजारात उलथापालथ

Lenskart Controversy: Lenskart ला 'टिकली-टिळा' वादाचा मोठा फटका बसला. शेअर बाजारात घसरण होऊन कंपनीचे सुमारे 4,500 कोटींचे नुकसान झाले.
Lenskart Controversy
Lenskart ControversyPudhari
Published on
Updated on

Lenskart Controversy: देशातील प्रमुख आयवेअर कंपनी Lenskart ला अलीकडील 'टिकली-टिळा' वादाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. सोमवारी शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि कंपनीच्या बाजारमूल्यात तब्बल 4,500 कोटींची घट झाली.

वादाची सुरुवात कशी झाली?

कंपनीची एक जुनी इंटरनल ‘ग्रूमिंग पॉलिसी’ सोशल मीडियावर व्हायरल झाली. या पॉलिसीमध्ये कर्मचार्‍यांना काही धार्मिक चिन्हे विशेषतः टिकली-टिळा लावण्यावर मर्यादा असल्याचा आरोप झाला. यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि कंपनीविरोधात बहिष्काराची मागणीही करण्यात आली.

शेअर्समध्ये मोठी घसरण

या वादाचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीचा शेअर सुमारे 5% पर्यंत घसरून ₹508 च्या आसपास पोहोचला. मागील सत्रात शेअर ₹534 च्या आसपास होता. मात्र, दिवसाअखेर काही प्रमाणात रिकव्हरी झाली आणि शेअर पुन्हा ₹530 च्या आसपास स्थिरावला.

Lenskart Controversy
New Labour Laws: 6 लाख पॅकेज असणाऱ्यांच्या हातात आता किती पगार येणार? काय आहेत नवीन नियम?

कंपनीला किती नुकसान?

घसरणीमुळे कंपनीचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात घसरले. एका टप्प्यावर कंपनीचे व्हॅल्यूएशन सुमारे ₹88,000 कोटींवर आले, जे आधी ₹92,800 कोटींच्या आसपास होते. म्हणजेच, एकाच दिवशी जवळपास ₹4,500 कोटींचा फटका बसला.

कंपनीचा माफीनामा

वाद वाढल्यानंतर कंपनीचे सह-संस्थापक पीयूष बन्सल यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की, व्हायरल झालेला दस्तऐवज जुना असून सध्याच्या धोरणाशी त्याचा संबंध नाही. तसेच, कंपनीने अधिकृतपणे माफी मागत स्पष्ट केलं की कोणत्याही धार्मिक चिन्हांवर बंदी नाही.

Lenskart Controversy
Loan Without Collateral: गॅरंटीशिवाय मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज; फक्त ही 5 कागदपत्रे द्यावी लागणार? काय आहे योजना?

नवीन धोरण जाहीर

यानंतर कंपनीने नवीन ‘इन-स्टोअर स्टाईल गाईड’ जाहीर केले. या धोरणानुसार कर्मचारी टिकली, टिळा, सिंदूर, हिजाब, पगडी, कडा यांसारखी धार्मिक आणि सांस्कृतिक चिन्हे वापरू शकतात. कंपनीने म्हटलं की, “कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर आम्हाला त्याचं मनापासून दुःख आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news