

MUDRA Loan Without Collateral: लहान व्यवसाय सुरू करायचा किंवा आधीचा व्यवसाय वाढवायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत आता कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता 20 लाखांपर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही योजना विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांसाठी, स्टार्टअप सुरू करणाऱ्यांसाठी आणि स्वयंरोजगार शोधणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
मुद्रा योजना ही लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. या योजनेत बँका, मायक्रोफायनान्स संस्था आणि NBFC मार्फत कर्ज दिलं जातं. या योजनेत ‘शिशु’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’ अशा तीन टप्प्यांमध्ये कर्ज दिलं जातं. सध्याच्या गरजा लक्षात घेऊन कर्जाची मर्यादा वाढवून 20 लाखांपर्यंत करण्यात आली आहे.
या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कर्जासाठी कोणतीही कोलॅटरल (तारण) देण्याची गरज नसते. सरकारकडून क्रेडिट गॅरंटी दिली जाते, त्यामुळे बँका सहज कर्ज मंजूर करतात. अर्जदाराच्या व्यवसायाचा प्लॅन, उत्पन्नाची माहिती आणि क्रेडिट हिस्ट्री तपासली जाते.
कर्जासाठी अर्ज करताना काही मूलभूत कागदपत्रं आवश्यक असतात—
ओळखपत्र (आधार, पॅन किंवा मतदान ओळखपत्र)
पत्त्याचा पुरावा (वीज बिल, रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
व्यवसायाचा तपशील (बिझनेस प्लॅन)
गेल्या 6 ते 12 महिन्यांचं बँक स्टेटमेंट
पासपोर्ट साईज फोटो
ही योजना लहान दुकानदार, कारागीर, महिला उद्योजक, स्टार्टअप सुरू करणारे तरुण आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी आहे. विशेषतः भांडवलाची कमतरता असणाऱ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे.
मुद्रा कर्जावरील व्याजदर बँकेनुसार वेगळा असतो, साधारणपणे 8% ते 12% दरम्यान असतो. कर्ज परतफेडीसाठी 3 ते 5 वर्षांचा कालावधी दिला जातो, त्यामुळे EMI चा ताण कमी राहतो. अर्जदार जवळच्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीनेही अर्ज करू शकतात. अनेक बँका डिजिटल प्रक्रियेमुळे लवकर मंजुरी देत आहेत.