Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 26,000 च्या जवळ, ऑटो-कन्झम्पशन शेअर्स चमकले

Stock Market Today: देशांतर्गत बाजारात सौम्य तेजी असून NIFTY 50 26,000 जवळ तर BSE Sensex हिरव्या रंगात आहे. ऑटो आणि कन्झम्पशन शेअर्समध्ये खरेदी दिसत असताना बँक निफ्टी मात्र दबावात आहे.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सलग चौथ्या दिवशी हिरव्या रंगात सुरुवात झाली. सकाळच्या व्यवहारात NIFTY 50 क्षणभर 26,000 च्या पुढे गेला, तर BSE Sensex सुमारे 80 अंकांनी वधारला. मात्र बँक निफ्टीमध्ये आजही घसरण झाली.

सकाळी साडे नऊच्या सुमारास सेन्सेक्स 84,300 च्या आसपास होता, तर निफ्टी जवळपास 26,000 च्या पातळीवर ट्रेड करत होता. ऑटो आणि कन्झम्पशन (ग्राहकोपयोगी वस्तू) क्षेत्रात खरेदी झाली, पण मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये हलकी घसरण झाली आहे.

जागतिक बाजारांचे संमिश्र संकेत

मंगळवारी अमेरिकन बाजारांत टेक शेअर्समध्ये नफावसुली झाली. मात्र डाओ निर्देशांकाने नवा लाइफ हाय गाठत सलग तिसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला. नॅस्डॅक मात्र जवळपास 150 अंकांनी घसरला. याचा परिणाम जागतिक बाजारांवर संमिश्र स्वरूपात दिसला, तर GIFT निफ्टी मजबूत राहिल्यामुळे भारतीय बाजाराला सुरुवातीला आधार मिळाला.

Stock Market Today
SaaSpocalypse Explained: एका पाटलामुळं जागतिक टेक मार्केट हादरलं; भारतासह जगातील शेअर बाजार कोसळले

FIIs-DIIs ची खरेदी सुरू

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सलग तिसऱ्या दिवशी खरेदी करत बाजाराला सपोर्ट दिला. कॅश आणि फ्युचर्स मिळून सुमारे 800 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी झाली. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनीही (DII) दुसऱ्या दिवशी बाजारात गुंतवणूक केली. त्यामुळे एकूण फ्लो सकारात्मक राहिला.

सोन्या-चांदीत घसरण, कच्चं तेल स्थिर

जागतिक बाजारात सोनं सुमारे 30 डॉलरने घसरलं, तर चांदीत जवळपास 2 टक्क्यांची घसरण झाली. देशांतर्गत बाजारातही सोनं आणि चांदी स्वस्त झाली. दुसरीकडे कच्चं तेल 69 डॉलरच्या आसपास स्थिर राहिलं असून, गुंतवणूकदारांची नजर आता अमेरिकेच्या इन्व्हेंटरी डेटावर आहे.

Stock Market Today
Abhishek Sharma: टीम इंडियाला मोठा धक्का! अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल, सामन्याआधीच फिटनेसची चिंता

BHEL चा OFS, Tata Motors ला मोठी ऑर्डर

आज नॉन-रिटेल गुंतवणूकदारांसाठी Bharat Heavy Electricals Limited (BHEL) चा ऑफर फॉर सेल खुला होत आहे. सरकार कंपनीतील 5 टक्के हिस्सा विकणार असल्यामुळे शेअरमध्ये हालचाल दिसू शकते. दरम्यान, Tata Motors ला सुमारे 70 हजार कमर्शियल वाहनांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर कंपनीच्या व्यवसायासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

निकालांचा परिणाम आणि आजचे स्टॉक्स

डिसेंबर तिमाहीत Titan Company चे निकाल मजबूत राहिले. काही कंपन्यांचे निकाल अपेक्षेनुसार आले, तर काहींनी निराशा केली. आज निफ्टीमध्ये M&M कडे लक्ष राहणार आहे. वायदा बाजारात Ashok Leyland, Divi’s Lab, Max Financial आणि Patanjali यांच्या निकालांवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news