

Share Market Crash: भारतीय शेअर बाजारमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या गोष्टी होऊ शकतात. परदेशातून याचे संकेत मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अमेरिकेचा शेअर बाजार रेज झोनमध्ये बंद झाला होता. अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्षात अमेरिका आता ग्राऊंड ऑपरेशन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आले होते.
त्यामुळं आशियातील शेअर मार्केट्सवर याचा परिणाम झाला. जपानच्या Nikkei पासून हाँगकाँगच्या HangSeng शेअर बाजात मोठा क्रॅश पहायला मिळाली. गिफ्टी निफ्टी देखील जवळपास २५० अंकांनी घसरला. आज भारतीय शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ११०० अकांनी घसरला. निफ्टी देखील २२ हजार ५०० च्या खाली पोहचली.
अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. युद्धबंदीच्या चर्चां कुठेपर्यंत आल्या याची कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाहीये. तसेच अमेरिका एका दावा करते तर इराण दुसरा दावा करते. त्यातच आता अमेरिका आपलं लष्कर इराणच्या भूमीवर उतरवण्याची शक्यता निर्माण झाल्यानं जागतिक बाजारात तणावाचे वातावरण आहे. यामुळं जागतिक तेल बाजारात देखील आग लागली आहे. क्रूड ऑईलच्या किंमतीत मोठी उसळी पहावयास मिळत आहे. ब्रेंट क्रूड ऑईल अचानक ११६ रूपये प्रती बॅरल पोहचलं आहे. याचा परिणाम जगातील अनेक शेअर बाजारांवर झालेला दिसत आहे.
भारतीय शेअर बाजारातील चढ उतारांचे संकेत हे गिफ्टी निफ्टीमधून मिळत असतात. सोमवारी गिफ्टी निफ्टीमध्ये मोठी घट पहावयास मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार गिफ्टी निफ्टीमध्ये २५० अंकांपेक्षा जास्तची घसरण झाली आहे. ही घसरण जवळपास १.१५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. फक्त दहा मिनिटात इंडेक्स 25,565 वरून 22,415 पर्यंत खाली आला.
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या शेअर बाजारात शेवटच्या दिवशी मोठी घसरण झाली होती. Dow Jones 793 अंक तर Dow Futures 218 अंकांनी कोसळले. SNDP 500 पासून नास्डॅक इंडेक्स सगळ काही कोसळत होतं. याचा परिणाम सोमवारी सकाळी जपान आणि कोरियाच्या मार्केटवर देखील झाला. हाँगकाँगचे मार्केट देखील लाल रंगात दिसू लागले आहेत.
गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठे चढ उतार दिसले. आठवड्यातील चार दिवसात BSE Sensex 949.74 अंकांनी पडला. तर NSE Nifty हा 294.9 अंकांनी पडला होता. देशातील टॉप १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये ही १.७५ लाख कोटी रूपयांची घसरण झाली होती.
सर्वाधिक नुकसान हे रिलायन्सचं झालं होतं. त्याचा मार्केट कॅप ८९,७२० करोड रूपयांनी कमी झाला होता. त्यानंतर HDFC Bank चे मार्केट कॅप ३७, २४० कोटी रूपयांनी पडले होते. तिसऱ्या क्रमांकावर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयचे मार्केट कॅप ३५ हजार ३९९ कोटी रूपयांनी कमी झालं.