

रियाध : इराणने सौदी अरेबियातील तळावर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेने महत्त्वाचे ई-3 सेंट्री विमान उद्ध्वस्त झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला प्रिन्स सुलतान हवाई तळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेला आणखी एका मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, उद्ध्वस्त झालेले हे विमान अंदाजे 300 दशलक्ष डॉलर्स किमतीचेे आहे.
ई-3 सेंट्री हे बोईंगने विकसित केलेले हवाई प्रारंभिक चेतावणी आणि नियंत्रण ठेवणारे अमेरिकन विमान आहे. एअर अँड स्पेस फोर्सेस मॅगझिनने सर्वप्रथम दिलेल्या वृत्तानुसार, 27 मार्च रोजी झालेल्या या इराणी हल्ल्यात 10 सैनिक जखमी झाले आहेत.
यूएस सेंट्रल कमांडच्या निवेदनाची प्रतीक्षा असताना, एअर अँड स्पेस फोर्सेस मॅगझिनने या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांचा हवाला देत या घटनेची माहिती दिली आहे. कथित क्षेपणास्त्र हल्ल्याची खात्री न झालेली छायाचित्रेही सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहेत. यामध्ये बोईंग ई-3 विमान निकामी झाल्याचे दिसत आहे.