GST Collection March 2026: मार्च एन्डला सरकारनं कमवला मोठा गल्ला... GST कलेक्शन २ लाख कोटींच्या पार

GST Collection March 2026
GST Collection March 2026pudhari
Published on
Updated on

GST Collection 2026: देशात जरी ऊर्जेच्या पातळीवर तणावाचा वातावरण असलं तरी एका बाबतीत सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च २०२६ मध्ये देशातील जीएसटी कलेक्शनबाबत चांगली बातमी समोर आली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात जीएसटी कलेक्शन जवळपास ८.२ टक्क्यांनी वाढले आहे. यावरून देशात उद्योग आणि मागणी या दोन्ही बाबतीत मजबूती दिसत आहे. जाणकारांच्या मते जीएसटी कलेक्शनमधील ही वाढ आर्थिक घडामोडी सातत्याने सुधारत असल्याचे संकेत देणारी आहे.

GST Collection March 2026
Ready Reckoner Rates Maharashtra 2026: रेडीरेकनर दर जैसे थे! राज्य सरकारचा बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा

दुसरीकडं जर एकूण जीएसटी कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर मार्च महिन्यापर्यंत हे कलेक्शन २ लाख कोटी रूपयांपर्यंत पोहचले आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत यात ८.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जीएसटी वसूली सरकारची तिजोरी मजबूत करत आहे. यामुळे आगामी काळात विकास योजनांना चांगली गती मिळण्याची देखील शक्यता आहे. एकूण जीएसटी कलेक्शनचे आकडे हे उत्साहवर्धक मानले जात आहेत.

GST Collection March 2026
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी चौथी कर्जमाफी जाहीर; फडणवीस सरकारचा 2026-27 चा अर्थसंकल्प विकासाभिमुख

०.२२ लाख कोटीचा रिफंड

जीएसटी रिफंडच्याबाबतीत बोलायचं झालं तर मार्च महिन्यात एकूण ०.२२ लाख कोटी रूपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे. तो गतवर्षीच्या तुलनेत १३.८ टक्के जास्त आहे. रिफंड वाढला असला तरी सरकराच्या नेट कमाईत कमतरता आलेली नाही. सरकारची नेट कमाई ही १.७८ लाख कोटी रूपये राहिली आहे. यावरून एक्सपोर्ट आणि व्यवसायाशी निगडीत विभागात देखील आर्थिक घडामोडींचा वेग वाढल्याचा अंदाज बांधला जात आहे.

GST Collection March 2026
CM Devendra Fadnavis | ...तर महाराष्ट्र जगातील तिसावी अर्थव्यवस्था असती : मुख्यमंत्री

ग्रॉस रेव्हेन्यू १.४६ लाख कोटी

उत्पन्नाच्या वेगवेगळ्या भागांवर नजर टाकली तर देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा ग्रॉस रेव्हेन्यू १.४६ लाख कोटी रूपये आहे. यात गतवर्षीपेक्षा ५.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. आयातीतून मिळणारे उत्पन्न हे ०.५४ लाख कोटी रूपयांपर्यंत पोहचले आहे. यात १७.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. आयातीच्या बाबतीत देशातील आर्थिक घडामोडी चांगल्या असल्याचं दिसून येतं.

GST Collection March 2026
Mumbai Water Transport: मुंबईत जलवाहतुकीला मोठी चालना; 340 किमी जलमार्गांचे जाळे उभारणार

कोणत्या राज्याचा वाटा जास्त

पूर्ण २०२५-२६ आर्थिक वर्षाचा विचार केला तर जीएसटी कलेक्शन ८.३ टक्क्यांनी वाढून २२.२७ लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त झाले आहे. तर जीएसटीचा नेट रेव्हेन्यू ७.१ टक्क्यांनी वाढून १९.३४ लाख कोटी रूपयांपर्यंत पोहचला.

मार्च महिन्यात राज्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जीएसटी कलेक्शनमध्ये सर्वात मोठं योगदान हे महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्रातून जवळपास ०.१३ लाख कोटी रूपयाचा जीएसटी मिळाला आहे. त्यानंतर कर्नाटक आणि गुजरात या राज्यांचा वाटा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news