

आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. विलंब शुल्काशिवाय प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे. अशा परिस्थितीत अनेक जणांची रिटर्न भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. तथापि, या गडबडीमध्ये रिटर्न भरताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते, अन्यथा तुमचे विवरण पत्र रद्द होऊ शकते.
टॅक्स रिटर्न भरताना तुमच्या उत्पन्नाच्या प्रकारानुसार योग्य फॉर्म निवडणे अत्यावश्यक आहे :
आयटीआर-1 (Sahaj) : फक्त पगारधारक व्यक्तींसाठी (रु. 50 लाखांपर्यंत उत्पन्न).
आयटीआर-2 : जर तुमचं घरभाडं, भांडवली नफा (जसे शेअर विक्री) किंवा परदेशी उत्पन्न असेल.
आयटीआर-3 : स्वतःचा व्यवसाय किंवा फ्रीलान्स काम करणार्यांसाठी.
आयटीआर-4 (Sugam) : छोट्या व्यवसायांसाठी किंवा प्रोफेशनल लोकांसाठी (सरल पद्धत वापरणार्यांसाठी).
चुकीचा फॉर्म वापरल्यास तुमचा रिटर्न अवैध ठरू शकतो.
फॉर्म 26AS - तुमच्या नावावर कोणत्या कंपन्यांनी/बँकांनी टीडीएस कापलं आहे, हे दाखवतं.
AIS (Annual Information Statement): तुमचं उत्पन्न, व्यवहार, व्याज, शेअर्स, भाडं इत्यादी दाखवतं.
तुमच्या कागदपत्रांतील माहिती आणि यामधील माहिती जुळायला हवी, नाहीतर नोटीस येऊ शकते.
फक्त पगार नाही, तर इतर उत्पन्नही लिहावे.
पगार / पेन्शन
बँकेचं व्याज (सेव्हिंग्स, एफडी)
घरभाडं
शेअर/म्युच्युअल फंड/क्रिप्टो विकून मिळालेला नफा
ट्युशन, फ्रीलान्सिंग, पार्टटाईम उत्पन्न.
अगदी थोडं उत्पन्न जरी असेल तरीही लपवू नका.
तुम्ही खालील गोष्टी दाखवून टॅक्समध्ये सूट मिळवू शकता :
80 सी (1.5 लाखपर्यंत): एलआयसी, पीएफ, पीपीएफ, ट्युशन फी, ईएलएसएस
80 डी : आरोग्य विमा प्रीमियम
80 टीटीए : बचत खात्यावरील व्याज (10,000 पर्यंत)
एचआरए (घरभाडं भत्ता) : भाड्याच्या घरात राहत असाल तर.
खोटी माहिती देऊ नका - सर्व पावत्या/दस्तऐवज ठेवा.
जर तुम्ही, घर, जमीन, शेअर्स, म्युच्युअल फंड, क्रिप्टो विकले असतील, तर त्यातून मिळालेला नफा (कॅपिटल गेन) दाखवा.
हल्ली लोकांचे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, डेरिव्हेटिव्ह ट्रांजेक्शन्स खूप आहेत. अशा व्यवहारांना इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये योग्य ट्रीटमेंट देणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्यावर टॅक्स लागतो, पण काही सूटही मिळू शकते.
जर तुम्ही भारतात राहणारे (रहिवासी) असाल आणि
परदेशात बँक खाते आहे
परदेशात गुंतवणूक / प्रॉपर्टी आहे
परदेशातून उत्पन्न मिळत असेल तर हे सर्व जाहीर करणं बंधनकारक आहे. लपविल्यास मोठी शिक्षा होऊ शकते.
तुमचं बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड योग्य असायला हवं.
हाच खाते क्रमांक रिफंडसाठी वापरला जातो.
ते खाते पॅन व आधारशी लिंक केलेले असावं.
सरकारनं सांगितले आहे की, तुमचं पॅन कार्ड आणि आधार लिंक असणं आवश्यक आहे.
लिंक नसेल तर तुमचा रिटर्न अमान्य होऊ शकतो.
तुमचं नाव (आधारवरचं नाव), पॅन, आधार क्रमांक, उत्पन्न इत्यादी काळजीपूर्वक भरा.
छोट्या चुका रिटर्न प्रक्रिया लांबवू शकतात.
फॉर्म भरल्यानंतर, तो ई-व्हेरिफाय (आधार, ओटीपी, नेटबँकिंग) किंवा स्वाक्षरी करून पोस्टाने पाठवा (सीपीसी, बेंगळुरु).
30 दिवसांत व्हेरिफाय न केल्यास रिटर्न रद्द होतो.
उशीर केल्यास रु. 5,000 पर्यंत दंड लागतो.
काही नुकसान (जसे शेअर बाजारातील) पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करता येत नाही.
आयटीआर-5 अॅक्नॉलेजमेंट
फॉर्म 16 (जर नोकरी असेल तर)
बँकेचे टीडीएस प्रमाणपत्र,
पावत्या. हे कर्ज/व्हिसासाठीही उपयोगी पडतात.
योग्य फॉर्म निवडला का?
फॉर्म 26AS/AIS तपासलं का?
सर्व उत्पन्न जाहीर केलं का?
सूट/डिडक्शन योग्यरीत्या घेतले का?
परदेशी माहिती दिली का?
बँक तपशील बरोबर आहेत का?
पॅन व आधार लिंक आहे का?
फॉर्म/आयटीआर वेळेत भरला आहे का?
व्हेरिफिकेशन केलं का?
सर्व कॉपी सेव्ह केल्या आहेत का?